साई संस्थांचे उपाध्यक्ष शंकरराव कोल्हे यांनी दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या -पिपाडा

साई संस्थांचे उपाध्यक्ष शंकरराव कोल्हे यांनी दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या -ममता पिपाडा

Shankarrao Kolhe, Vice President of Sai Sanstha provided quality healthcare facilities – Mamta Pipada

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Mon 21 Mar 2022 18:50Pm.

कोपरगांव:  माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या सामाजिक कार्याचा ठेवा खूप मोठा असून त्यातून त्यांनी अहमदनगर जिल्ह्याची ओळख राज्यात निर्माण केली, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे देवस्थान साईबाबा शिर्डीचे तत्कालीन उपाध्यक्ष म्हणून त्यांनी दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी केली अशा शब्दात राहाता नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा ममता पिपाडा व डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी श्रद्धांजली वाहिली.

पिपाडा दांपत्याने यांनी येसगाव येथील कोल्हे वस्ती येथे जाऊन कोल्हे कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी सिंधुताई कोल्हे, दत्तू नाना कोल्हे नितीन बिपिन डॉ. मिलिंद, सौ स्नेहलता कोल्हे, अमित, सुमित, विवेक व ईशान कोल्हे यांची भेट घेऊन सांत्वन केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page