कोपरगावात तिथीनुसार शिवजयंती साध्या पध्दतीने
In Kopargaon, Shiva Jayanti is performed in a simple manner according to the date
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Mon 21 Mar 2022 20:00Pm.
कोपरगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती २१ मार्चला साजरी केली. मात्र कर्मयोगी शंकरराव कोल्हे यांच्या निधनामुळे यावर्षी तिथीनुसार साजरी होणारी शिवजयंती साध्या पद्धतीने करण्यात आली.
शिवजयंतीला अनेक शिवप्रेमी किल्ले शिवनेरी किल्ल्यांवर जाऊन शिवाई देवीच्या मंदिरातील दिव्यावर ज्योत प्रज्वलित करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनाच्या आदल्या दिवशी शिवज्योत आणण्यात आली. ही पवित्र ज्योत मिरवणुकीने शहरात आणण्यात आली. सकाळी सहा वाजता शिव छत्रपती स्मारक येथे जोडप्यांच्या हस्ते वैदिक पद्धतीने वेदमंत्रांच्या घोषात दुग्धाभिषेक करण्यात आला. तर ११ उखळी तोफांची सलामी देण्यात आली.
छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी अहिंसा चौकात शिवप्रेमी अभिवादन करण्यासाठी भव्य व्यासपीठ उभारून त्यावर छत्रपती शिवरायांची सिंहासनाधीष्ट आकर्षक प्रतिमा ठेवण्यात आली.
दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे रद्द करण्यात आले. त्याऐवजी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती साजरी केली.





