कोपरगाव शहरात अतिक्रमण कारवाई

कोपरगाव शहरात अतिक्रमण कारवाई

Encroachment action in Kopargaon city

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Wed 24 Mar 2022 21:00Pm.

कोपरगाव : कोपरगाव शहरात आज नगरपालिकेच्या वतीने अचानक अतिक्रमण मोहीम राबवल्याने छोट्या मोठ्या टपरीधारकांचे मोठे नुकसान झाले. ही कारवाई कोणत्याही नोटीस न देता करण्यात आली असे टपरीधारकांचे म्हणणे आहे.

नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, कारवाईत व्यस्त असल्याने त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अथवा नगरपालिकेच्या वतीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

बुधवार २४ रोजी सकाळपासूनच  प्रथम धारणगाव रस्ता, बस स्थानक परिसर, व्यापारी धर्मशाळेत चा परिसर, शहरातील मुख्य रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोरील परिसर येथेही अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजे दरम्यान साईबाबा कॉर्नर येथे नगरपालिकेचा अतिक्रमण विभागाचा ताफा मुख्याधिकारी गोसावी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्यासह पोहचला.

तेथे त्यांनी श्री साई तपोभूमी सर्विस स्टेशन लगतच्या अनधिकृत भिंती व काही टपऱ्या उध्वस्त करताना टपरीधारकांचा वीज प्रवाह खंडित केला. गेल्या दहा वर्षांपूर्वी शहरातील जवळपास पंधराशेच्या पुढे अतिक्रमणे काढण्यात आली होती त्या घटनेला दहा वर्षाचा काळ लोटला आहे. सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यानंतर अचानक ही मोहीम आज कोणतीही पूर्व सूचना न देता टपरीधारकांच्या टपऱ्या उठवण्यात आल्या, असे टपरीधारकांची म्हणणे आहे.

टपऱ्या व अतिक्रमणे काढण्याबाबत तहसील कार्यालयात बैठक झाली असल्याचे खात्रीलायक समजले. या टपऱ्या उठवताना दुजाभाव करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सदरची अतिक्रमणे ही एकमेकांच्या सांगण्यावरून काढण्यात आली, असे आरोप होत आहे. साडेआठ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती त्यानंतर अतिक्रमण विभागाचा फौज फाटा व पोलीस व मुख्याधिकारी घटनास्थळावरून निघून बस स्थानकाच्या परिसरात गेले मग तेथील अतिक्रमणे काढण्यात आली.

  त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला शहरातील अतिक्रमणाबाबत तक्रारी आल्या आहेत, त्यावरून आम्हाला आदेशानुसार या कारवाया कराव्या लागत आहेत. आज किती कारवाई केल्या याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले अद्याप आकडा फिक्स नाही, अनेकांनी तोंडी सूचना सांगितल्यानंतर अतिक्रमणे स्वतःहून काढली आहेत व रहदारीला अडथळा होत आहे ही अतिक्रमणे आम्ही काढणार आहोत, त्याआधी नुकसान होऊ नये म्हणून टपरीधारकांनी आपापल्या टपऱ्या रस्त्याला वाहतुकि ला अडथळे येत असलेल्या व विविध अतिक्रमणे स्वतःहून काढावीत असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. राबवलेल्या या अतिक्रमण मोहिमेमुळे अनेकांचे धावे जाणले आहेत, आधीच दोन वर्षापासून कोरोणा असल्याने अनेक जण उध्वस्त झाले आहेत त्यातच ही अचानक राबवलेली अतिक्रमण मोहीम त्यामुळे अनेक जण जास्त ठेवले आहेत आता या प्रश्नावरून राजकारण सुरू झाल्याने आरोप प्रत्यारोप व या प्रश्नावरून संबंधितांना घेरण्याचे, मोर्चे प्रति आंदोलने करण्याच्या स्थितीपर्यंत हे लोक पोहोचले आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page