समृद्धी महामार्गासाठी ना. बनसोडे यांची शेतकऱ्यांसह ना. काळेंनी घेतली भेट

समृद्धी महामार्गासाठी ना. बनसोडे यांची शेतकऱ्यांसह ना. काळेंनी घेतली भेट

No. for Samrudhi Highway. Bansode with farmers no. A visit by Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Thu 24 Mar 2022 19:30Pm.

 कोपरगाव : समृद्धी महामार्गमुळे तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या समस्या सुटल्या नसल्याने सार्वजनिक बांधकाम, स्वच्छता व पाणीपुरवठा राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांचे ना.आशुतोष काळे यांनी पीडित शेतकर्‍यासह त्यांची मंत्रालयात भेट घेतली.व अडचणी मांडल्या.

यावेळी बैठकीत ना. आशुतोष काळे यांनी समृद्धी महामार्गाच्या कामामुळे खराब झालेले रस्ते तातडीने दुरुस्त करून द्यावे, डक्टचा आकार लहान झाल्यामुळे वाहतुकीस अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे डक्टचा आकार मोठा करण्यात यावा. चांदेकसारे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत लवकरात लवकर बांधून द्यावी. जोपर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना पर्यायी रस्ते उपलब्ध करून द्यावे, अंडरपास इलेक्ट्रिक लाईनचे काम निष्कृष्ट दर्जाचे झाले आहे.त्यामुळे भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होवू शकतात. त्याबाबत नागरिकांनी अनेकवेळा तक्रार करूनही समृद्धी महामार्गाचे ठेकेदार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. या अंडरपास इलेक्ट्रिक लाईनचे काम सद्यस्थितीत करणे सोयीचे आहे. त्यामुळे योग्य त्या दुरुस्त्या ताबडतोब कराव्या. तसेच ज्या स्थानिक शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत या अडचणी तातडीने सोडविण्याच्या सूचना गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीला देवून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवाव्या अशा मागण्या केल्या. व शेतकऱ्यांच्या वतीने करून त्यांना निवेदन दिले. ना. संजय बनसोडे यांनी सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या समजून घेवून सदर अडचणी तातडीने सोडवण्यासाठी समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीला सूचना दिल्या.

यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता एस.के. सुरवसे, उपसचिव डी.बी. विभूते, कार्यकारी अभियंता व्ही.आर. सातपुते, वाय. पाटील, प्रशांत थडवे, ए.जी. बांगर, टी.डी. दुबे, कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, चेअरमन गोरक्षनाथ जामदार, सोपानराव आभाळे, सुधाकर होन, योगिराज देशमुख, महेश लोंढे, गणेश घाटे, चांगदेव चव्हाण, संजय जामदार, मुकुंद चव्हाण, अरुण साळुंके आदीसह शेतकरी उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page