नगर परिषद: शहरातील अतिक्रमण हटविण्याची  कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरूच होती.

नगर परिषद: शहरातील अतिक्रमण हटविण्याची  कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरूच होती.

Municipal Council: The action to remove encroachments in the city continued for another day.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Thu 24 Mar 2022 20:30Pm.

कोपरगाव: शहरातील अतिक्रमण हटविण्याची नगर परिषदेची कारवाई गुरुवारीही सुरूच होती. मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांसह पथकाने शहरातील अतिक्रमणधारकांवर कडक कारवाई केली.

शहरातील मुख्य रस्त्यावरील पोलीस ठाण्या लगत परिसर, बिरोबा चौक, सावरकर चौक, छत्रपती शिवाजी पुतळा परिसर, मुख्य रस्ता, पांडे स्वीट कॉर्नर ते थेट तहसील कार्यालय, पंचायत समिती पर्यंत आज पालिकेच्या अतिक्रमण विभागाने सलग दुसऱ्या दिवशीही अतिक्रमण मोहीम राबवून बहुतांशी अतिक्रमणे काढण्यात आली त्यामुळे शहरातील बऱ्याचश्या भागातील श्वास मोकळा झाला आहे.

गेल्या दहा वर्षांपूर्वी शहरातील जवळपास पंधराशेच्या पुढे अतिक्रमणे काढण्यात आली होती, त्यावेळी नोटिसा देऊन पोलीस बळ मागून अतिक्रमणे काढण्यात आली होती, मात्र त्याच जागेवर पुन्हा अतिक्रमणे झाली होती त्यामुळे त्यांना नोटीस देणे क्रमप्राप्त नाही असे त्यांनी सांगितले. त्या घटनेला दहा वर्षाचा काळ लोटला आहे. सध्या शहरात अतिक्रमणावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यानंतर अचानक ही मोहीम आज दुसऱ्या दिवशी कोणतीही पूर्व सूचना न देता टपरीधारकांच्या टपऱ्या उठवण्यात आल्या. या टपऱ्या उठवताना दुजा भाव करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पक्ष पातळीवर कार्यकर्ते एकमेकाकडे बोटे दाखवून आमची अतिक्रमणे काढली त्यांचीही काढा अशा तक्रारी करत आहेत. सदरची अतिक्रमणे ही एकमेकांच्या सांगण्यावरून काढण्यात आली, असे आरोप होत आहे. एकमेकांच्या राजकीय सूडापोटी मात्र गोरगरीब लोक लोकांचे नुकसान यात झाले आहे

अजून दोन दिवस ही अतिक्रमण मोहीम राबवणार असल्याचे सांगण्यात आले. अतिक्रमणाविरोधातील त्यांची कारवाई सुरूच राहणार असल्याचे मुख्याधिकारी गोसावी म्हणाले, दुकानदारांनी नगर परिषदेला सहकार्य करून शहरातील अतिक्रमणांना अजिबात प्रोत्साहन देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तुमचे सामान फक्त दुकानात ठेवा. रस्त्यावर सामान टाकून अतिक्रमण करून कठोर कारवाई करण्यास नगर परिषदेला भाग पाडू नका. त्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ नये म्हणून या लोकांना नगर परिषदेने सणासुदीत सूट दिली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आता सणासुदीचा हंगाम संपल्यानंतरही शहरात अतिक्रमणांचे वर्चस्व कायम आहे. अनेकवेळा आवाहन करूनही हे लोक न.प.च्या आदेशाचे पालन करत नाहीत. असेही ते म्हणाले

बुधवारीही नगर परिषदेच्या पथकाने धारणगाव रस्ता, बस स्थानक परिसर, व्यापारी धर्मशाळा, हेडगेवार चौक समोरील परिसरात बुलडोझर  चालविला शेड टपऱ्या उद्ध्वस्त केल्या. अतिक्रमणे काढतांना मात्र नगरपालिकेने दुजाभाव केला असून काही अतिक्रमणे व टपऱ्या तशाच ठेवलेल्या आहेत यामुळे जनतेत मोठा रोष असून त्यांच्यावर कारवाई का झाली नाही. असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. या पीडितांच्या तक्रारीबाबत मुख्याधिकारी व पोलिस निरीक्षक यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी आपण सर्व अतिक्रमणे काढणार असल्याची ग्वाही दिली आहे.

मुख्याधिकारी गोसावी म्हणाले की, दुकानदारांनाही अतिक्रमण काढण्याचे आवाहन करण्यात आले होते, मात्र ते त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष देत नाहीत आणि मुद्दाम दुकानांच्या बाहेर पार्किंगच्या जागेत माल ठेवून विक्री करत आहेत. त्यामुळे नागरिकांना चालायलाही जागा मिळत नाही. शहराची हद्द कमी करण्यात आली आहे. त्यावर कारवाई झाली, मात्र काही लोकांचा विरोध होता. अशा लोकांना आंदोलन करण्यापेक्षा नगर परिषदेला सहकार्य करा आणि शहराला अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

आता या प्रश्नावरून राजकारण सुरू झाल्याने आरोप प्रत्यारोप व या प्रश्नावरून संबंधितांना घेरण्याचे, मोर्चे प्रति आंदोलने करण्याच्या स्थितीपर्यंत हे लोक पोहोचले आहेत. अतिक्रमण काढल्यावर अनेक नागरिकांतून त्याचे स्वागत होत आहे तर ज्यांचे हातावर संसार आहेत त्यांचे प्रपंच उध्वस्त झाले असल्याने याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटून नाराजी व्यक्त केली जात आहे.

चौकट दरम्यान मनसेच्या कार्यकर्ता अलीम शहा यांने मुख्याधिकारी शांताराम गोसावी तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांची व शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्याशी हुज्जत घातली त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, शहर पोलीस निरीक्षकांशी झटापट व मुख्याधिकाऱ्यांना वाईट अपशब्द वापरल्यामुळे पोलिसांनी शहा याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली.

Leave a Reply

You cannot copy content of this page