कोपरगावात तब्बल १२ वर्षानंतर (एक तप) अतिक्रमण हटाव पुनरावृत्ती 

कोपरगावात तब्बल १२ वर्षानंतर (एक तप) अतिक्रमण हटाव पुनरावृत्ती

In Kopargaon, after 12 years (one tap), encroachment removal was repeated

हम तो डूबेंगे सनम, तुमको भी ले डूबेंगे, Hum to doobenge sanam, tumko bhi le doobenge,

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Fir 25 Mar 2022 20:00Pm.

कोपरगाव: मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांसह पथकाने शहरातील अतिक्रमणधारकांवर कडक कारवाई केली. यापूर्वी सन २०१०  कोपरगाव शहराच्या या त्या टोकापर्यंत  दक्षिण उत्तर  अतिक्रमण काढण्यात आले होते. त्यानंतर  तब्बल बारा वर्षानंतर सन २०२२ मध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेची पुनरावृत्ती करण्यात आली आहे. फरक एवढाच की दुर्दैवाने ही अतिक्रमण मोहीम प्रशासकीय धर्तीवर न राबता एकमेकांच्या जिरवा जिरवीत “हम तो डूबेंगे सनम, तुमको भी ले डूबेंगे’,या धर्तीवर लोकांनीच स्वतःसाठी राबविली हे कटू सत्य आहे. कारवाई करणाऱ्या अधिका-यांनीही  असेच  सूचक विधान केले आहे. आणि म्हणूनच याच गोष्टीचे वाईट वाटते.

गेल्या बारा वर्षांपूर्वी शहरातील जवळपास पंधराशेच्या पुढे अतिक्रमणे काढण्यात आली होती, त्यावेळी नोटिसा देऊन पोलीस बळ मागून अतिक्रमणे काढण्यात आली होती, मात्र त्याच जागेवर पुन्हा अतिक्रमणे झाली होती. त्यामुळे त्यांना नोटीस देणे क्रमप्राप्त नाही असे त्यांनी सांगितले. फरक एवढाच झाला की २०१० साली ज्यांची  अतिक्रमणे काढली. त्या व्यावसायिकांना त्या ठिकाणी तब्बल पंचवीस ते तीस वर्ष झाली होती. त्या बिचार्‍यांना  विस्थापित व्हावे लागले होते. गेल्या १२ वर्षांत या विस्थापितांच्या पुनर्वसन करण्याचे केवळ राजकीय भांडवल करण्यात आले. परंतु प्रत्यक्षात एकाही विस्थापितांचे पुनर्वसन करण्यात आले नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यानंतर या रिकाम्या झालेल्या जागेवर  अनेक आगंतुकांनी  नव्याने अतिक्रमण केले होते. आता त्या घटनेला बारा वर्षाचा काळ लोटला आहे. 

बुधवारीही नगर परिषदेच्या पथकाने धारणगाव रस्ता, बस स्थानक परिसर, व्यापारी धर्मशाळा, हेडगेवार चौक समोरील परिसरात बुलडोझर सालगीरा चालविला शेड टपऱ्या उद्ध्वस्त केल्या. गुरुवारी दुसऱ्या दिवशी शहरातील मुख्य रस्त्यावरील पोलीस ठाण्या लगत परिसर, बिरोबा चौक, सावरकर चौक, छत्रपती शिवाजी पुतळा परिसर, मुख्य रस्ता, पांडे स्वीट कॉर्नर ते थेट तहसील कार्यालय, पंचायत समिती पर्यंत  पालिकेच्या अतिक्रमण विभागाने सलग दुसऱ्या दिवशीही अतिक्रमण मोहीम राबवून बहुतांशी अतिक्रमणे काढली. तिसऱ्या दिवशी पालिकेने कारवाई स्थगित ठेवली असली तरी लोक धास्ती पोटी आपापले अतिक्रमण स्वतःहून काढून टाकताना दिसत होते. त्यामुळे शहरातील बऱ्याचश्या भागातील श्वास मोकळा झाला आहे. 

यावेळी हम तो डूबेंगे सनम, तुमको भी ले डूबेंगे, या उक्तीप्रमाणे अतिक्रमण धारकांनी आधी त्याचे काढा, मग माझे काढतो असा पवित्रा घेतल्याने व एकमेकाच्या अतिक्रमणाकडे बोट दाखविल्यामुळे दोन्हीकडची अतिक्रमणे नेस्तनाबूत करताना प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा विरोध झाला नाही, अगदी विनासायास दोन अधिकाऱ्यांनी शेकडो अतिक्रमणे उधस्त केली. हे जरी खरे असले तरी अचानक कोपरगाव शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात  अतिक्रमण हटाव मोहीम का ? कुणासाठी ? कशासाठी ? कोणाच्या सांगण्यावरून  राबविण्यात आली या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या चर्चेला मोठे उधाण आले आहे. 

दोन वर्ष कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कोपरगावच्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे अतिक्रमण मोहिमेमुळे कंबरडे मोडले आहे. ज्यांच्यामुळे हे घडले त्यांना त्याची राजकीय किंमत मोजावीच लागेल अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. सदरची अतिक्रमणे ही एकमेकांच्या सांगण्यावरून काढण्यात आली, असे आरोप होत आहे. एकमेकांच्या राजकीय सूडापोटी मात्र गोरगरीब  लोकांचे नुकसान यात झाले आहे. एकीकडं अतिक्रमण काढण्याचे स्वागत होत असली तरी ज्यांचे हातावर संसार आहेत त्यांचे प्रपंच उध्वस्त झाले असल्याने याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटून नाराजी व्यक्त केली जात आहे. या कारवाईचे दूरगामी राजकीय परिणाम मात्र संबंधितांना भोगावेच लागतील.

जे आज अतिक्रमणात विस्थापित झालेले आर्थिक संकटाने मोडून गेले आहेत. त्यांचे पुनर्वसन होणे शक्य नाही. ते आता पुन्हा लवकर उभे राहतील अशी आशाही नाही. इतिहास पाहता आज उद्या पुन्हा नवे लोक येतील त्याच त्याच जागेवर नव्याने अतिक्रमण करून दुकाने, टपऱ्या थाटून व्यवसाय सुरू करतील, कालचक्र सुरू राहील परंतु आज झालेल्या अतिक्रमण कारवाईत नेस्तनाबूत होऊन जे विस्थापित झाले आहेत. त्यांचे काय ?  त्यांना कोणी वाली आहे की नाही ?  कोणतीही घटना घडल्यानंतर त्या घटनेचे चांगले-वाईट दूरगामी परिणाम घडत असतात,  जिरवाजिरवीसाठी आज एकमेकांकडे बोट दाखवून सर्वजनच उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात एकमेकाबद्दल च्या द्वेषाची बीजं व कटूतेचे इमले उभे राहिल्यास नवल वाटायला नको. 

Leave a Reply

You cannot copy content of this page