कोपरगाव मतदार संघातील देवस्थानांना क दर्जासह ३.१९ कोटी निधी मंजूर – ना. आशुतोष काळे

कोपरगाव मतदार संघातील देवस्थानांना क दर्जासह ३.१९ कोटी निधी मंजूर – ना. आशुतोष काळे

3.19 crore fund sanctioned for temples in Kopargaon constituency with C grade – no. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Thu 31 Mar 202216 :30Pm.

कोपरगाव : मतदार संघातील पोहेगाव येथील श्री मयुरेश्वर गणपती देवस्थान, कोकमठाण येथील श्री. लक्ष्मीमाता मंदिर व ब्राम्हणगाव श्री जगदंबा माता मंदिरासह काही देवस्थान यांना महाविकास आघाडी सरकारने ‘क’ वर्ग दर्जा मंजूर केला आहे. व सांस्कृतिक विभागाकडून ३ कोटी १९ लाख ८८ हजार निधी मंजूर झाला असल्याची माहिती ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

मतदार संघातील पौराणिक व जागृत देवस्थानाच्या ठिकाणी भाविकांना आवश्यक सोयी सुविधासाठी देवस्थानांना ‘क’ वर्ग दर्जा मिळविण्यासाठी व पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून निधी मिळावा यासाठी ना. आशुतोष काळे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून पोहेगाव येथील श्री मयुरेश्वर गणपती देवस्थान (४९.९७ लाख), पुणतांबा येथील श्री चांगदेव महाराज समाधी मंदिर (९९.९९ लाख), माहेगाव देशमुख येथील श्री दत्त मंदिर देवस्थान (४९.९७ लाख), प्रती जेजुरी अशी ओळख असलेल्या वाकडी येथील खंडोबा मंदिर देवस्थान (१९.९८ लाख), कोकमठाण येथील लक्ष्मी माता मंदिर देवस्थान (४९.९८ लाख) व चांदेकसारे येथील श्री भैरवनाथ मंदिर देवस्थान (४९.९९ लाख) या देवस्थानांचा समावेश आहे. या निधीतून या देवस्थानांचा परिसर सुशोभिकरण करण्यात येणार असून भाविकांसाठी सोयी सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.

या देवस्थानाच्या विकासासाठी निधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ, पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे, पर्यटन राज्य मंत्री ना. अदिती तटकरे यांचे ना.आशुतोष काळे यांनी मतदार संघातील जनतेच्या वतीने आभार मानले आहे. 

Leave a Reply

You cannot copy content of this page