साक्षी गाडे हिची पश्चिम विभागीय विद्यापीठ बुद्धीबळ स्पर्धे साठी निवड
Selection of Sakshi Gade for Western Division University Chess Tournament
Rajendara Salkar| वृत्तवेध ऑनलाईन! Mon 11 Apr 2022,
18 :38Pm.
कोपरगाव : सोमय्या कॉलेजची बुद्धीबळ पटू कु. साक्षी संजीव गाडे हिची पश्चिम विभागीय विद्यापिठ बुद्धीबळ स्पर्धेसाठी पुणे विद्यापीठ संघात निवड झाली आहे.
साईबाबा ज्युनिअर कॉलेज, शिर्डी येथे नगर विभाग संघात स्थान मिळविल्यानंतर पिंपरी चिंचवड येथे झालेल्या पुणे विभागीय स्पर्धेतील उत्कृष्ठ कामगीरीमुळे साक्षी हिची पुणे विद्यापीठ संघात निवड झाली आहे.
AURO University सुरत येथे पश्चिम विभागीय विद्यापीठ बुध्दीबळ स्पर्धेमध्ये पुणे विभागाच्या बुद्धीबळ संघाचे प्रतिनिधीत्व करित आहे. कु साक्षी ही कोपरगाव येथील एस. टी. आगारातील वाहतुक नियंत्रक संजीव गाडे यांची कन्या आहे तसेच तिला क्रीडा शिक्षक डॉ.सुनील कुटे सर,रमेश येवले सर, नितीन सोळके सर , संकेत गाडे यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले आहे,
तिचे अध्यक्ष अशोक रोहमारे, सचिव संजीव कुलकर्णी, विश्वस्त संदीप रोहमारे,प्राचार्य डॉ.बी.एस.यादव, कोपरगाव चेस व स्पोर्ट्स क्लबचे महेश थोरात,नुपूर संचेती, नितीन जोरी, यश बंब, प्रमोद वाणी व कृष्णराव गाडे ,सुनील गाडे , किरण गाडे आदिनी अभिनंदन केले आहे.





