कोपरगावचा माळकरी रिक्षाचालक, पण खऱ्या आयुष्यात श्रावणबाळ

कोपरगावचा माळकरी रिक्षाचालक, पण खऱ्या आयुष्यात श्रावणबाळ

Malkari rickshaw puller from Kopargaon, but in real life Shravanbal

Rajendara Salkar| वृत्तवेध ऑनलाईन! Tue 12 Apr 2022,
14 :30Pm.

कोपरगाव : श्रावण बाळ म्हटले की माता-पित्याच्या सेवेसाठी झटणाऱया श्रावणाची कथा सर्वांना माहीत आहे. सध्याच्या आधुनिक जगातही असे काही श्रावणबाळ दिसून येतात. त्यांना कडक सलाम केल्यावाचून राहवत नाही. असाच एक श्रावणबाळ म्हणजे कोपरगावचा माळकरी रिक्षाचालक बबन जोगदंड. होय, तेच बबन जोगदंड रिक्षा चालविण्याचे काम करतात, जे खऱ्या आयुष्यात आज्ञाधारक मुलगा बनून आईची दिवसरात्र सेवा करतात.

काल परवाचा रामनवमीला आपल्या १०५ वर्षाच्या आईला ७१ वर्षाच्या बबन जोगदंड यांनी घरची रिक्षा असतानाही साईबाबांचे दर्शन करण्यासाठी खांद्यावरुन १७ किलोमीटर पायी चालत शिर्डीला नेले. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राम नवमीच्या दिवशी एक वृद्ध मुलगा आपल्या वृद्ध आईला खांद्यावर बसवून पायी शिर्डीला दर्शनाला घेऊन जातांना दिसत आहे. नेटकऱ्यांनी या मुलांना आधुनिक श्रावणबाळ असे म्हटले आहे.

कोपरगाव तालुका रिक्षा संघटनेच्या वतीने सत्कार करताना रिक्षा संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व सर्व सभासद

याबद्दल बोलताना बबन जोगदंड म्हणाले, मी आत्तापर्यंत सतरा ते अठरा वेळेस कोपरगाव ते पंढरपुर पायी दिंडी ला गेलेलो आहे. माझी अनेक वर्षापासून इच्छा होती की, माझ्या आईला आळंदी ते पंढरपूर खांद्यावरून घेऊन जायचे परंतु ते मला शक्य झाले नव्हते. ते शल्य माझ्या मनात होते. बजरंग बली चा पेरणे पेरणे बजरंग बली बलीच्या प्रेरणेने मला साई आरतीतील ” शिर्डी माझे पंढरपुर, साईबाबा रमावर आठवली आणि माझा निर्णय पक्का झाला. राम नवमीच्या दिवशी खांद्यावर बसून मी आईला शिर्डी ला घेऊन साईबाबा चे दर्शन करून घेतले आणि माझी मनोकामना पूर्ण झाली. विशेष म्हणजे मला कुठलाही थकवा जाणवला नाही. किंवा काही अडचण आली नाही. ही माझ्या आईची शक्ती मला मिळाली आहे. अशी भावना बबन जोगदंड यांनी व्यक्त केली. कोपरगाव तालुका ऑटोरिक्षा संघटनेचे सभासद असलेले बबन जोगदंड (७१) व त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई (१०५) या दोघां माय लेकरांचा सत्कार रिक्षा संघटनेच्या वतीने करण्यात आला. यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव म्हणाले, रिक्षा सारखा व्यवसाय करताना संघटनेच्या माध्यमातून बबन जोगदंड सारखे मातृभक्त मी संघटनेत निर्माण करू शकलो असा रिक्षावाला घडवू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे. यावेळी बोलताना उपाध्यक्ष राजेंद्र सालकर म्हणाले, आजच्या कलियुगात एकीकडे मानवतेला शाप असणाऱ्या वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. अशा काळातही सर्व साधने उपलब्ध असताना भर उन्हात आईला खांद्यावर बसवुन १७ किलोमीटर पायी चालत शिर्डीला साई दर्शनासाठी नेणारा पाहिल्यानंतर त्यांना आजच्या काळातील आधुनिक श्रावणबाळ असेच म्हणावे लागेल. यावेळी संघटनेचे भाऊसाहेब जाधव, प्रकाश शेळके,मल्हारी देशमुख, अनिल वाघ, पापा तांबोळी, हुसेन शेख बिलाल शेख, रामकिसन पवार, नंदू पवार, रफिक शेख, राजू नावाडकर, रवी खिल्लारी आदीसह रिक्षा संघटनेचे पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने हजर होते.

रिक्षा पतसंस्था व शिवसेनेच्या वतीने या मायलेकरांचं सत्कार करतांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले,आजच्या काळात भाऊ-बहीण एकमेकाला विचारत नाही मुले आई-वडिलांना विचारत नाही. सर्व असूनही आई-वडिलांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यांच्या भावना विचारात घेतल्या जात नाही. परंतु अशाही काळात बबन जोगदंड यांनी आपल्या म्हाताऱ्या आईला खांद्यावरून शिर्डीला दर्शनाला नेले ही आमचा रिक्षा सभासद म्हणून आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page