उक्कडगांव रेणुकामातेची १४ व १५ एप्रिल रोजी यात्रा विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन

उक्कडगांव रेणुकामातेची १४ व १५ एप्रिल रोजी यात्रा विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन

Yatra of Ukkadgaon Renukamata on 14th and 15th April Organizing various religious programs

Rajendara Salkar| वृत्तवेध ऑनलाईन! Mon 11 Apr 2022,
18 :28Pm.

कोपरगाव : सालाबादप्रमाणे याही वर्षी चैत्री पौर्णिमेनिमीत्त तालुक्यातील श्रीक्षेत्र उक्कडगांव येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री रेणुकामाता देवीची यात्रा १४ व १५ एप्रिल रोजी होत असुन त्यानिमीत्ताने विविध धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रेणुकामाता उक्कडगांव ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गंगाराम शिंदे यांनी केले आहे.

गेल्या दोन वर्षापासुन कोरानाची परिस्थिती असल्याने रेणुकादेवी यात्रेचा उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यांवर मर्यादा आल्या होत्या. यंदाचे वर्षी उक्कडगांव रेणुकामाता देवी मंदिरात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवार १४ एप्रिल रोजी पानड, बैलगाडी शर्यत तर शुकवार १५ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता धानोरे येवला येथील कर्णमहाल काठी मिरवुणक त्यानंतर श्री रेणुकामाता देवी पालखी मिरवणुक आदि धार्मीक कार्यक्रम होत आहे. लोणीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील घराण्याकडे चुन्याच्या घागरीचा तर टाकळीच्या देवकर घराण्याकडे पाण्याच्या कावडीचा मान आहे. या यात्रेनिमीत्त मंदिर परिसरात विविध खेळण्यांचे तसेच खाद्यपदार्थ व धार्मीक साहित्याचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. रेणुकामाता देवी मंदिराचा जीर्णोध्दाराचे काम सरालाबेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सुरू आहे. तर कुंभारीच्या श्रीमती उषादेवी रायभान चिने व लासलगांवचे दिलीपराव होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर कळसाचे काम चालु आहे. देवीला निम साडी नेसवणे, बोललेले नवस फेडण्याची परंपरा येथे असुन त्यासाठी राज्यभरातुन व परराज्यातून भाविक मोठया प्रमाणात येथे येतात. वर्षभरात येथे चैत्री पौर्णिमा, हनुमान जयंती व नवरात्र उत्सव साजरे केले जातात. मंदिर जिर्णोध्दार कार्यासाठी तन मन धनाने तसेच सिमेंट, स्टील, वाळु, खडी, वीट आदि बांधकाम साहित्य भाविकांनी देवुन सहकार्य करावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे. १५ एप्रिल रोजी सायंकाळी जंगी कुस्त्यांचा हंगामा, टांगा शर्यत व लोकनाट्याचा करमणुकीचा कार्यक्रमही आयोजित केला आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page