कोपरगावात गुरूवारी नवचंडी याग व रविवारी महाभंडारा प्रसाद भोजन
Navchandi Yag on Thursday and Mahabhandara Prasad meal on Sunday in Kopargaon
Rajendara Salkar| वृत्तवेध ऑनलाईन! Wed 13 Apr. 2022,
17 :30Pm.
कोपरगांव : शहरातील सर्व भाविक भक्तांचे श्रध्दास्थान बिरोबा चौकातील ” श्री सप्तशृंगी देवी ” मंदिराच्या जिर्णोद्धार निमित्त चैत्र महिन्याचे औचित्य साधून ” गुरूवार दि.१४ रोजी नवचंडी याग”आयोजित केला आहे. व त्या निमित्ताने रविवार दि. १७ रोजी सायंकाळी ६-३० ते आगमनापर्यंत महाभंडारा प्रसाद भोजन आयोजित केले आहे.
तरी सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमास यावे असे आवाहन करण्यात आले आहे. आग्रहाने आमंत्रित करीत आहोत. कापड बाजार, बिरोबा चौक, श्री सप्तशृंगी देवी चे मंदिराच्या कामासाठी व भंडारा प्रसादाचे कामासाठी ज्या ज्या दानशूर व्यक्तींनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रित्या रोख व वस्तुरुपात मदत केली त्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.





