शिरसगाव, लौकी, शहापूर, चांदगव्हाण, सोनारी ग्रामपंचायत इमारतीसाठी एक कोटीचा निधी मंजूर – ना. काळे

शिरसगाव, लौकी, शहापूर, चांदगव्हाण, सोनारी ग्रामपंचायत इमारतीसाठी एक कोटीचा निधी मंजूर – ना. काळे

One crore fund sanctioned for Shirasgaon, Lauki, Shahapur, Chandgavhan, Sonari Gram Panchayat building – no. Kale

Rajendara Salkar| वृत्तवेध ऑनलाईन! Wed 13 Apr 2022,
17 :40Pm.

कोपरगाव : विधानसभा मतदार संघातील शिरसगाव, लौकी, शहापूर, चांदगव्हाण, सोनारी या पाच गावांच्या ग्रामपंचायत इमारतीसाठी महा विकास आघाडी सरकारने प्रत्येकी वीस लाख रुपये याप्रमाणे एक कोटीचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

पंचायत  राज्याचा पायाभूत घटक असलेल्या ग्रामपंचायतीला गावपातळीवर अनन्य साधारण महत्व आहे. उपलब्ध साधनसंपत्तीनुसार नागरिकांची गरज ओळखून त्या-त्या गावाचा विकास करण्याची जबाबदारी हि ग्रामपंचायतीवर असते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सर्वसुविधांयुक्त ग्रामपंचायत कार्यालय असणे अत्यंत गरजेचे आहे.

मात्र मतदार संघातील शिरसगाव, लौकी, शहापूर, चांदगव्हाण, सोनारी या गावांना ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत नव्हती. त्याबाबत महाविकास आघाडी सरकारकडे या गावांना ग्रामपंचायत कार्यालयासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेऊन महाविकास आघाडी सरकारने मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी वरील गावांना प्रत्येकी २० लाख याप्रमाणे १ कोटी निधी मंजूर केला आहे. त्याबद्दल ना.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांचे आभार मानले आहे.                    

Leave a Reply

You cannot copy content of this page