जागवल्या स्मृती : संजीवनीमुळेच मी आज अमेरिकेतील टेसला कंपनीत-निलम कासवा
Awakened Memories: Sanjeevani is the reason why I am in the company of Tesla in America today – Sapphire Turtle
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed 20 Apr 2022, 17 :00Pm.
कोपरगांव: संजीवनी अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना येथिल प्राद्यापकांनी जे शिकविले, जे रूजविले, किंबहुना अभ्यासक्रमा व्यतिरीक्त आधुनिक तंत्रज्ञान शिकवुन वेगवेगळे कौशल्ये माझ्यात बिंबविली गेली, या शिक्षण व ज्ञानाच्या जोरावरच विश्वव्यापक स्पर्धा असतानाही आज मी टेसला या अमेरिकेतील कंपनीत असोसिएट मॅनेजर म्हणुन कार्यरत असल्याचे भावोद्गार संजीवनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या माजी विद्यार्थिनी निलम कासवा यांनी ‘माय स्टोरी बोर्ड’ या या सदराखाली सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांचे हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला,
यावेळी संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजचे डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख डाॅ. एम. व्ही. नागरहल्ली, समन्वयक डाॅ. डी. पी. भास्कर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कासवा पुढे म्हणाल्या, की मी वेगवेगळ्या कंपनीत इंजिनिअर म्हणुन काम केले. इंजिनिरीग ज्ञानाबरोबरच काॅम्प्युटर एडेड डीझाईन, ड्राईंग क्रीएटीव्हीटी, वेगवेगळ्या साॅफ्टवेअरचे असलेल्या ज्ञानामुळे मला टेसला कंपनीत येण्याची ऑफर दिली. खरे तर मला ‘मेसा’ या मंचच्या विविध स्पर्धेच्या अनुभवाचा प्रचंड फायदा झाला. आपण जिंकत नाही, तो पर्यंत लढाई संपलेली नाही, असेच मानावे, एक दिवस आपण जींकलेलेच असु, असा सल्ला कासवा यांनी शेवटी दिला. त्यांचा कोळपेवाडी-संजीवनी ते अमेरिका त्यांचा जीवन प्रवास सर्वांनाच प्रेरणादायी ठरला.
चौकट
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी जगाच्या पाठीवर कोठेही असले तरी आपल्या गावी आल्यानंतर किमान एक दिवस का होईना, महाविद्यालयात येवुन, आपापल्या विभागांना भेटी देवुन आपल्या प्राध्याकांप्रती आदर व्यक्त करीत स्मृती जागवतात. त्याचा फायदा सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येय प्राप्तीकडे जाण्यासाठी होतो.
Post Views:
351





