शिर्डी श्री साईबाबा विश्वस्त मंडळ नियमानुसार आहे की नाही ? उद्या अंतिम सुनावणी

शिर्डी श्री साईबाबा विश्वस्त मंडळ नियमानुसार आहे की नाही ? उद्या अंतिम सुनावणी

Is Shirdi Shri Sai Baba Board of Trustees as per rules or not? Final hearing tomorrow

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Tue 19 Apr 2022,19 :00Pm.

कोपरगाव: साईबाबा संस्थानवर राज्य सरकारने नियुक्त केलेल्या ११ विश्वस्तांची पात्रता तसेच नव्याने स्थापन केलेले विश्वस्त मंडळ नियमानुसार आहे की नाही याप्रकरणी दि.२० रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात अंतिम सुनावणी होणार आहे.

शिर्डी येथील श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्थेतील ११ विश्वस्तांची निवड होऊन सात महिने उलटले असून उर्वरित ५ विश्वस्त पदांंची निवड करण्यात यावी असा आदेश जारी केला होता. मात्र राज्य सरकारकडून पाच विश्वस्तांची नियुक्ती करण्यासाठी विलंब झाला आहे. राज्य सरकारच्या वतीने पाच विश्वस्तांची नेमणूक करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्याचे खात्रीपूर्वक सुत्रांकडून मिळाली आहे.

दरम्यान, श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्थेवर विश्वस्त पदाचा तिढा दोन वर्षांच्या कालखंडानंतर सुटला असून महाविकास आघाडी सरकारने अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर उपाध्यक्ष सेनेकडे ठेवले. कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. आशुतोष काळे व त्यांचे दहा सहकारी विश्वस्तांनी शिर्डीत साईसमाधीचे दर्शन घेवून दि.१७ सप्टेंबर रोजी अध्यक्ष व विश्वस्तांनी पदभार स्विकारुन स्वाक्षर्‍या केल्या .
डिसेंबर २०१९ मध्ये श्री साईबाबा विश्वस्त मंडळाची मुदत संपली होती. तेव्हापासून प्रशासकीय स्तरावर व न्यायालय तसेच तदर्थ समिती निर्णय घेत होते.देशातील श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी साई संस्थानच्या १७ विश्वस्तांपैकी पदसिद्ध विश्वस्त सोडून ११ विश्वस्तांची निवड करण्यात आली असली तरी देखील उर्वरित काँग्रेसच्या २, शिवसेनेच्या २ आणि राष्ट्रवादी १ अशा एकूण ५ जागांवर विश्वस्तांची निवड करणे बाकी आहे.उर्वरित पाच सदस्य नियुक्तीस शासनाकडून विलंब झाला आहे. न्यायालयाने यासंदर्भात राज्य सरकारला फटकारले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दैनंदिन कामे करण्याची परवानगी असलेल्या विश्वस्त मंडळास कोरम पूर्ण नसल्याने धोरणात्मक निर्णय घेता आला नाही.
विश्वस्तांच्या पाच जागा शिल्लक असून यामध्ये शिवसेना दोन काँग्रेस दोन व राष्ट्रवादी एक अशा जागा आहेत. त्यामुळे आता दि.२० रोजी विश्वस्त मंडळ नियुक्ती प्रकरणी अंतिम सुनावणी असल्याने कोणाला संधी मिळते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार असून शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्याकडून कोपरगाव शिर्डी येथील स्थानिक कार्यकर्त्यांना प्राधान्य मिळणार का? जर मिळणार असेल तर मग कोण विश्वस्त होणार याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहे. मात्र या निवडीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे.

सदर सुनावणीदरम्यान श्री साईबाबा संस्थानवर राज्य सरकारने नियुक्त केलेल्या ११ विश्वस्तांची पात्रता तसेच नव्याने स्थापन केलेले विश्वस्त मंडळ नियमानुसार आहे की नाही याबाबत युक्तीवाद होईल.

– अ‍ॅड. अजिंक्य काळे, संभाजीनगर हायकोर्ट

Leave a Reply

You cannot copy content of this page