भाजपला रामराम; सुरेगावचे भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादीत

भाजपला रामराम; सुरेगावचे भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादीत

Goodbye BJP; BJP workers from Suregaon join NCP

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Tue 19 Apr 2022,17 :00Pm.

कोपरगाव :तालुक्यातील वडगाव पाठोपाठ सुरेगावचे भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यामध्ये रविंद्र वाबळे, किशोर वाबळे, सोपान कदम, दिगंबर कदम या भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.श्री साई संस्थान अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ना. आशुतोष काळे यांचे विकासाचे व्हिजन असलेलं नेतृत्वावर प्रभावित होवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे भाजपा कार्यकर्त्यांनी सांगितले.

यावेळी शिवाजीराव वाबळे, राजेंद्र मेहेरखांब, सरपंच शशिकांत वाबळे,  भैय्यासाहेब वाबळे, श्रीधर कदम, रविंद्र देवकर, सुदाम वाबळे, नानासाहेब कदम, मनोज वाबळे, शांताराम वाबळे,  अमोल वाबळे, गणेश सुपनर, मयुर सारडा आदी उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page