सुरेगाव रुग्णाच्या संपर्कातील ८ जण कोरोना पॉझिटिव्ह; ९ जण निगेटिव्ह
सुरेगाव , कोरोना कनेक्शन – औरंगाबाद
कोपरगाव कोरोना अपडेट , १६ जुलै २०२० /: २६० तपासण्या, २३ जण कोरोना ग्रस्त, १२ जण कोरोनामुक्त, एका महिलेचा मृत्यू, १० जणांवर उपचार सुरू तर २२५ अहवाल निगेटिव्ह
वृत्तवेध ऑनलाईन | 16 July 2020,
By: Rajendra Salkar
कोपरगाव : तालुक्यातील सुरेगाव येथील पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील ८ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला असून त्यांच्यावर
कोपरगाव एस. एस. जी. एम. कॉलेज मधील कोवीड सेंटर येथे तात्काळ उपचार सुरु करण्यात आल्याचे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले.
या कुटुंबातील व्यक्ती औरंगाबाद येथून सुरेगाव येथे घरी आला होता त्याला कोरोना झाला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याने १७ जणांची कोरोना चाचणी केली. त्यातील ८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना एस. एस. जी. एम. कॉलेज मधील कोवीड सेंटर मध्ये ठेवण्यात आले असून उपचार सुरु करण्यात आले आहेत. तर इतर ९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आल्याची माहिती डॉ. फुलसौंदर यांनी दिली. रुग्ण आढळलेले ठिकाण व परिसर १४ दिवसांसाठी अंशतः बंद करण्यात आला आहे.
दरम्यान करंजी येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात आलेल्या १४ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या अहवालाची प्रतीक्षा असून या १४ जणांना कोपरगाव कोवीड सेंटर येथे ठेवण्यात आले आहे .
अशी माहिती डॉ. फुलसौंदर यांनी दिली आहे या सर्व ३१ जणांवर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे कोपरगाव ग्रामीण वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे (आव्हाड) लक्ष ठेवून आहेत. दरम्यान लोकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आव्हानही आरोग्य प्रशासनाने केले आहे.