समता स्कूलची  टॉपर कु.संजना भुतडा

समता स्कूलची  टॉपर कु.संजना भुतडा

चार वर्षे अग्रगण्य, समताची उत्तुंग भरारी – सौ.स्वाती कोयटे

सायली तागडे हिंदीत कट टू कट (१०० पैकी १००)

वृत्तवेध ऑनलाइन 16 July  2020

By : Rajendra Salkar 

कोपरगाव : समता इंटरनॅशनल सी.बी.एस. ई. १० ची कु.संजना चेतन भुतडा ही विद्यार्थीनी ९७ टक्के गुण घेऊन समता इंटरनॅशनल स्कूल ची टॉपर  असल्याची माहिती समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे यांनी दिली.

सलग चार वर्षे जिल्ह्यात अग्रगण्य स्थान मिळविणाऱ्या समता स्कूलची सी.बी.एस. ई. पुरस्कृत अभ्यासक्रमांत उत्तुंग भरारी मारली असल्याचेही त्या म्हणाल्या,

संजना भुतडा ही श्रीरामपूरचे सुप्रसिध्द वास्तुविशारद चेतन भुतडा व सौ.शीतल भुतडा यांची कन्या आहे.

तेजस सचिन आहेर याने ९६ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमाक तर सुयोग मनिष कोठारी याने ९५.८ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला, समता स्कूलचे या वर्षी ६८ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे.

९५ टक्के प्लस- ( ७ विद्यार्थी )

कु.संजना भुतडा, चि.तेजस आहेर, चि.सुयोग कोठारी, कु.कृतिका गोंदकर, चि.सिद्धांत नरवडे, चि.सी जगताप, चि.शंतनू होन,

९० टक्के प्लस – (२३विद्यार्थी )

आदिशा ठोळे, राज गांधी, तेजस कवडे, तीर्थ ठोळे, भूमिका कदम, वैष्णवी गोरे, ख़ुशी भुतडा, तनिष्का अग्रवाल, शांभवी राहतेकर, योगेश्वरी गाडे, रेहान अत्तर, हर्षदा कवडे, नेतल लाहोटी, वसू अग्रवाल, तेजल वहाडणे, क्रिश पोरवाल,

८५ टक्के प्लस- (३५ विद्यार्थी )

सायली तागडे हिंदी विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले आहे.

सौ स्वाती कोयटे म्हणाल्या, समता ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून नावारूपाला आलेली आहे. अभ्यासक्रमाबरोबरच विविध उपक्रम राबवीत असतो. ‘leave no child behind’ स्कूलच्या ब्रीदवाक्याप्रमाणे समता इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी इयत्ता आठवी पासूनच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांतर्गत अभ्यासक्रम पूर्ण करून घेत असतात. तसेच इयत्ता १० वी ला आल्यानंतर गरजेनुसार गुणवत्तेनुसार शैक्षणिक,मानसिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. मार्गदर्शनामुळे समता स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कष्टाचेच फळ आहे’. असेही त्या शेवटी म्हणाल्या,

या सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे सर्व व्यवस्थापन समितीचे सदस्य, शैक्षणिक संचालिका सौ.लिसा बर्धन उपप्राचार्य श्री.विलास भागडे, उपप्राचार्या सौ.शैला झुंजारराव, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page