तांब्याची तार चोरी; मुद्देमाल ताब्यात, आरोपींना कोठडी

तांब्याची तार चोरी; मुद्देमाल ताब्यात, आरोपींना कोठडी

Copper wire theft; Accused in custody, custody of the accused

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed 20 Apr 2022,17 :30Pm.

कोपरगाव : कोपरगाव एसटी बस आगार भंडार शाखेचे कुलूप तोडून चोरट्यांनी १४ हजार ९४२ रूपयांची वेल्डिंग तांब्याची तार चोरून नेली होती. याप्रकरणी बाबू तुळशीराम खरात (५३) सोनार वस्ती, कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती सदर फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिसांनी भादवि कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने अवघ्या ४८ तासाच्या आत मुद्देमालासह चोरट्यांच्या मुसक्या आवळून पोलीस कोठडीत टाकले.

असलम उमर कुरेशी (३६, रा. सुभाष नगर कोपरगाव,), समाधान प्रवीण पाटील (२१, रा. राहणार सुभाष नगर कोपरगाव,) अशी आरोपींची नावे असून, पोलिसांनी त्यांना अटक केली. तर न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. रिमांड मध्ये विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली देऊन १४ हजार रुपये किमतीची २१ किलो वजनाची तांब्याची तार काढुन दिली.

पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. अर्जुन दारकुंडे, पो. ना. बी.एस. कोरेकर,पो. कॉ. राम खारतोडे पो. कॉ. गणेश काकडे पो. कॉ. व्ही.एल. मासाळ, पो. कॉ. संभाजी शिंदे, पो. कॉ. कांदळकर यांचा पथकात समावेश होता पुढील तपास पोना. अर्जुन दारकुंडे हे करीत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page