गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महेश्वर महाराजांच्या यात्रोत्सवाला दणदणीत प्रारंभ!
A Grand Commencement to Maheshwar Maharaj’s Festival on the Auspicious Occasion of Gudi Padwa!
कोळपेवाडीत भाविकांची उसळली भक्तीची लाट; अशोकराव काळे यांचे दर्शन, शुभेच्छांचा वर्षाव
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 20Fir.19.50 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : सालाबादप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याच्या पवित्र मुहूर्तावर (दि.१९) कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे ग्रामदैवत श्री महेश्वर महाराजांच्या भव्य यात्रोत्सवाला उत्साहाच्या जल्लोषात प्रारंभ झाला. पंचक्रोशीसह दूरवरून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्री महेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. वर्षभर भाविकांची वर्दळ असणारे हे देवस्थान यात्रेच्या काळात विशेषच गजबजून गेले. यात्रेचा ‘सर्वात मोठी यात्रा’ असा लौकिक पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
यावेळी माजी आमदार अशोकराव काळे यांनी यात्रोत्सवास भेट देत श्री महेश्वर महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. “महाराजांची कृपादृष्टी सर्वांवर राहो,” अशी प्रार्थना त्यांनी करत सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून देवस्थानाला ‘क’ वर्गाचा दर्जा मिळवून देत सभामंडप उभारणी व परिसर सुशोभिकरणासाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे भाविकांना सोयी-सुविधांचा मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.
यावेळी यात्रा समितीचे सदस्य, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.
Post Views:
2






