मराठीला जागतिक व्यासपीठ देणारी ‘अनुवाद क्रांती’ : काळेंचा सरकारला दणका, निर्णयाचे जोरदार स्वागत!

मराठीला जागतिक व्यासपीठ देणारी ‘अनुवाद क्रांती’ : काळेंचा सरकारला दणका, निर्णयाचे जोरदार स्वागत!

The ‘Translation Revolution’ Giving Marathi a Global Platform: Kale Delivers a Strong Jolt to the Government; Decision Hailed Enthusiastically!

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद अकादमीमुळे ज्ञानभाषा म्हणून मराठीची झेप; साहित्य, संशोधन आणि विद्यार्थ्यांना नवे बळ

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 20Fir.19.20 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव :राज्याच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद अकादमी’ स्थापनेच्या निर्णयावर विधानसभेत जोरदार चर्चा रंगली. या निर्णयाचे स्वागत करताना महाराष्ट्र विधिमंडळ मराठी भाषा समितीचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी सरकारच्या या पावलाला“मराठीच्या जागतिकीकरणाची नांदी” असे ठसठशीत शब्दांत वर्णन केले.

अनेक वर्षांपासून साहित्यिकांकडून अनुवाद अकादमीची मागणी होत होती. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर या मागणीला अधिक धार आली होती. अखेर सरकारने हा निर्णय घेतल्याने मराठी साहित्याला जागतिक दालन खुले होणार असल्याचे काळे यांनी स्पष्ट केले. “आपल्याकडे दर्जेदार साहित्याचा अफाट खजिना आहे; मात्र भाषेच्या भिंतीमुळे तो जगापर्यंत पोहोचू शकला नाही. आता ही भिंत कोसळणार आहे,” असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

या अकादमीच्या माध्यमातून मराठीतील उत्कृष्ट ग्रंथ, कविता आणि संशोधनपर साहित्य इंग्रजीसह विविध भारतीय व जागतिक भाषांमध्ये अनुवादित होणार आहे. त्याचवेळी जगातील सर्वोत्तम साहित्य आणि ज्ञान मराठीत आणले जाणार असल्याने विचारांची देवाणघेवाण वाढून मराठी वाचकांची बौद्धिक भूक भागणार आहे.

मराठी माध्यमातील विद्यार्थी आणि संशोधकांसाठी हा निर्णय ‘गेमचेंजर’ ठरणार असल्याचेही काळे यांनी अधोरेखित केले. “तांत्रिक, वैज्ञानिक आणि आधुनिक ज्ञान मराठीत उपलब्ध झाले तर शिक्षणातील दरी कमी होईल आणि मराठी विद्यार्थ्यांची स्पर्धात्मक ताकद वाढेल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने उभारली जाणारी ही अकादमी मराठीला खऱ्या अर्थाने ‘ज्ञानभाषा’ बनवण्याचा मार्ग मोकळा करणार असल्याचे मत व्यक्त करत काळे यांनी महायुती सरकारच्या या निर्णयाला दूरदृष्टीचा ठोस नमुना ठरवले. “ही केवळ घोषणा नाही, तर मराठीच्या नव्या युगाची सुरुवात आहे,” असा दमदार राजकीय संदेश देत त्यांनी सरकारला पुढील अंमलबजावणीसाठीही सज्ज राहण्याचा इशारा दिला.

Leave a Reply

You cannot copy content of this page