उन्हाच्या तडाख्यात कोपरगाव आगारात ‘समतेची’ शीतल तृष्णा!

उन्हाच्या तडाख्यात कोपरगाव आगारात ‘समतेची’ शीतल तृष्णा!

Amidst the Scorching Heat at Kopargaon Depot—The Cool, Thirst-Quenching ‘Samata’!

पाणपोईचे उद्घाटन, १५ डस्टबिनचे लोकार्पण; स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचा ठसा

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 20Fir.19.30 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव :उन्हाळ्याच्या कडक झळा सुरू होत असतानाच कोपरगाव बस आगारात समता चॅरिटेबल ट्रस्ट आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांनी उभारलेली पाणपोई प्रवाशांसाठी दिलासादायक ठरली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब यांच्या हस्ते करण्यात आले.

स्वच्छ आणि थंड पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय पुन्हा एकदा समता परिवाराने दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना काका कोयटे यांनी “समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखूनच हे उपक्रम राबवले जात आहेत,” असे ठामपणे सांगितले. स्वच्छता ही केवळ घोषणांपुरती न राहता कृतीत उतरावी, यासाठी “स्वच्छ बस स्थानक, स्वच्छ गाव” ही संकल्पना अधिक बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले. मागील वर्षी कोपरगाव बस स्थानकाने मिळवलेल्या तिसऱ्या क्रमांकावर समाधान न मानता यंदा प्रथम क्रमांकासाठी झटण्याची हाक त्यांनी दिली.

यावेळी समता पतसंस्थेच्या वतीने १५ डस्टबिनचे लोकार्पणही उत्साहात पार पडले. “स्वच्छ बस स्थानक, स्वच्छ शहर” या उपक्रमातून आगार परिसर अधिक स्वच्छ, नीटनेटका आणि शिस्तबद्ध ठेवण्याचा संदेश देण्यात आला.

आगार प्रमुख अमोल बनकर यांनी अशा उपक्रमांमुळे प्रवाशांना थेट दिलासा मिळत असल्याचे सांगत समता परिवाराचे कौतुक केले. “पाणपोई ही उन्हाळ्यातील जीवनदायिनी ठरते, तर डस्टबिनमुळे स्वच्छतेची सवय लागते,” असे ते म्हणाले. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

या प्रसंगी समता पतसंस्थेचे पदाधिकारी, स्थानक कर्मचारी, चालक-वाहक तसेच प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक जाणिवा जपणाऱ्या या उपक्रमामुळे कोपरगाव आगारात केवळ पाण्याचीच नव्हे, तर स्वच्छतेचीही नवी लाट उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Leave a Reply

You cannot copy content of this page