रोजगार मंदिर’मुळे महिलांना घरबसल्या रोजगार; महिलांची स्वावलंबनाकडे मोठी झेप
‘Rozgar Mandir’ Enables Women to Work from Home; A Major Leap Towards Self-Reliance
आ. आमदार आशुतोष काळेंच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक प्रभागात विस्ताराचा समता महिला बचत गटाचा संकल्प
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 20Fir.19.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :घरकामाच्या चौकटीत अडकून पडलेल्या महिलांच्या हाताला आता थेट काम मिळवून देत स्वावलंबनाचा नवा अध्याय खडकी परिसरात लिहिला जात आहे. ‘रोजगार मंदिर’ या संकल्पनेतून महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देत समता महिला बचत गटाने बेरोजगारीवर थेट घाव घातला आहे.
आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपक्रमामुळे सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळत असून, “काम मागणाऱ्या नव्हे, तर काम निर्माण करणाऱ्या महिला” घडविण्याचा निर्धार यामागे दिसून येत आहे. खडकीत सुरू झालेले हे ‘रोजगार मंदिर’ आता संपूर्ण शहरासाठी आदर्श ठरण्याच्या मार्गावर आहे.
समता परिवाराचे संस्थापक काका कोयटे व अध्यक्षा सौ. सुहासिनी कोयटे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना सौ. कोयटे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,“महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केल्याशिवायसमाजाची खरी प्रगती शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक प्रभागात रोजगार मंदिर उभारण्याचा आमचा ठाम संकल्प आहे.”
या रोजगार मंदिरात अगरबत्ती, कापूरसह ५० हून अधिक उत्पादनांचे प्रशिक्षण देण्यात येत असून, महिलांना प्रत्यक्ष कामाची जोड देत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून दिले जात आहे. विशेष म्हणजे, घरातूनच व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात आली असून, त्यामुळे घर आणि व्यवसाय यांचा समतोल साधणे सुलभ झाले आहे.
पुष्पाताई काळे यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या महिला सक्षमीकरणाच्या कार्याला या उपक्रमामुळे नवी गती मिळाली असून, कोपरगाव शहरात महिला उद्योजकतेची चळवळ अधिक बळकट होण्याची चिन्हे आहेत.
यावेळी नगरसेवक संदीप कपिले, सोमेश आढाव, महेश गोसावी, संदीप जगझाप, विजय गोयल, रेखा जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
चौकट
‘बेरोजगारीवर थेट वार महिलांच्या हाताला मिळाला उद्योगाचा आधार,घरातूनच व्यवसायाची संधी महिलांच्या कर्तृत्वाला मिळणार नवे पंख,‘कामाची भीक नव्हे, कामाची निर्मिती’करून प्रत्येक प्रभागात ‘रोजगार मंदिराच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची चळवळ वेगवान करण्याचा समता बचत गटाचा ठाम निर्धार!
Post Views:
8








