आरोग्याचा गाफीलपणा महागात पडू शकतो – ना. आशुतोष काळे

आरोग्याचा गाफीलपणा महागात पडू शकतो – ना. आशुतोष काळे

Health carelessness can be costly – no. Ashutosh Kale

कोपरगाव भव्य मोफत आरोग्य मेळावाKopargaon grand free health fair

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Thu 21 Apr 2022, 17 :40Pm.

कोपरगाव: मतदार संघातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी अडीच वर्षात आरोग्य सेवा वाढविण्यावर भर दिला आहे.वेळेत योग्य उपचार करा अन्यथा आरोग्याचा गाफीलपणा महागात पडू शकतो. अशी भिती श्री साई संस्थान अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे गुरुवार (दि.२१) रोजी भव्य मोफत आरोग्य मेळाव्याचे शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते . यावेळी शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती .

सदर शिबिराचा लाभ एकूण ६१७ लोकांनी घेतला त्यामध्ये ३२७ पुरुष व २९० स्त्रीया सदर शिबिरामध्ये तपासणीअंती खालील प्रमाणे रुग्ण शोधण्यात आले मोतीबिंदू शस्त्रक्रिया ३९ रुग्न, उच्च रक्तदाब ५९ रुग्ण, मधुमेह ८४, हृदय रोग १३, हर्निया २ रुग्ण , बालहृदय रोग दोन रुग्ण दंतचिकित्सा २१ या पद्धतीने रुग्ण शोधण्यात आले सदर शिबिरामध्ये देहदानासाठी ४ ,नेत्रदानासाठी २ लोकांनी समतीपत्र भरून दिले व रक्तदान नऊ लोकांनी केले. अशी माहिती डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

शिबिर यशस्वी होण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप व सर्व कोपरगाव तालुका आरोग्य विभाग यांचे सहकार्य लाभले.

नामदार काळे पुढे म्हणाले , कोरोनाच्या पहिल्या लाटेत आरोग्य विभागाने अनुभवाच्या जोरावर पहिली लाट परतवून परिस्थिती नियंत्रणात आणली. दुसऱ्या लाटेत देखील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनचे ५० बेडचे स्वतंत्र कोविड वार्ड निर्माण केला आहे. ऑक्सिजन प्लांट उभारला व तालुका ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण केला आहे. १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी मिळाली आहे.ग्रामीण भागात माहेगाव देशमुख तिळवणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईनाथ रुग्णालय व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांना चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी माझे प्रयत्न राहतील. आरोग्य मेळाव्यामध्ये नागरिकांना मोफत डिजिटल हेल्थ आय.डी. व आयुष्यमान भारत कार्ड काढून दिले जाणार असून सर्व आजारांची मोफत तपासणी केली जाणार आहे याचा लाभ घ्या असे आवाहन ना.काळे यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, डॉ. गोवर्धन सांगळे, डॉ. अजय गर्जे, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, डॉ. हेमंत राठी, डॉ. संजय महाजन, डॉ. संजय उंबरकर, डॉ. रमेश कोठारी, डॉ. दीपाली आचार्य, डॉ. अनिल उंडे, डॉ. आतिष काळे, डॉ. कुणाल घायतडकर, डॉ. विजय क्षीरसागर, डॉ. अमित नाईकवाडे, डॉ. योगेश लाडे, डॉ. मंजुषा गायकवाड, डॉ. सायली भांगरे, डॉ. तेजश्री चव्हाण, डॉ. शेळके, डॉ. पूजा गर्जे, सचिन चांदगुडे, अर्जुन काळे, विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, हाजी मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, सुनील शिलेदार, संजय काळे, संतोष चवंडके, रमेश गवळी, दिनकर खरे, फकीर कुरेशी, जावेद शेख, चंद्रशेखर म्हस्के, प्रशांत वाबळे, अशोक आव्हाटे, वाल्मिक लहिरे, नारायण लांडगे, आकाश डागा, शुभम लासुरे, सचिन जोशी, शैलेश साबळे, सचिन गवारे, विकास बेंद्रे, शंकर घोडेराव, लक्ष्मण भाटे, आकाश सोळसे, अल्ताफ अत्तार, संदीप जाधव आदींसह नागरिक उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page