समता पतसंस्थेच्या योगदानामुळे राज्यातील पतसंस्था चळवळीला बळकटी- खा.डॉ. सुजय विखे
The contribution of Samata Patsanstha strengthens the Patsanstha movement in the state. Sujay Vikhe
समता पतसंस्थेची स्वतःची ब्रँड व्हॅल्यू – आ. संग्राम जगताप Samata Patsanstha’s own brand value – Sangram Jagtap
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Mon 25 Apr 2022,17 :30Pm.
कोपरगाव- महाराष्ट्रातील सर्व पतसंस्था या आपल्याच शाखा असल्याचे समजून राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे हे पतसंस्था चळवळीत कार्य करीत असुन समता पतसंस्थेच्या योगदानामुळे राज्यातील पतसंस्था चळवळीला बळकटी आली असल्याचे गौरवोद्गार खा.डॉ. सुजय विखे यांनी समता पतसंस्थेच्या नगर सावेडी येथील दुसऱ्या शाखेच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. संग्राम जगताप हे होते.
खा. सुजय विखे पुढे म्हणाले कि. ज्या पतसंस्था अडचणीत आल्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी परत मिळत नाही त्या पतसंस्थांवर फौजदारी कायद्यान्वये कठोर कारवाई केल्यास ठेवीदारांच्या ठेवी परत मिळु शकतील. त्या दृष्टीने कायद्यात बदल झाले पाहिजे. मला यावेच लागले कारण कोयटे परीवाराचे विखे परीवाराशी घट्ट नाते असल्याचा आवार्जुन उल्लेख केला.
प्रास्ताविकात समता पतसंस्थेचा कार्याचा आलेख मांडतांना चेअरमन काका कोयटे म्हणाले, ६६१ कोटींच्या ठेवी, ४७५ कोटी कर्ज पुरवठा यात १७५ कोटीचे सोनेतारण कर्ज व १७५ कोटी रुपयांची गुंतवणूक या आधारे लिक्विडीटी बेस प्रोटेक्शन फंडाअंतर्गत समता पतसंस्थेच्या १२.५० लाख रुपया पर्यंतच्या ठेवी सुरक्षित झाल्या आहेत. या माध्यमांतून ९९.३५ टक्के ठेविदारांना संरक्षण देण्यास समता पतसंस्था यशस्वी झाली आहे. तसेच सहकारी पतसंस्थांमधील ठेवींचा उपयोग रोजगार व व्यवसाय निर्मिती साठी होत असल्याने नागरिकांनी आपल्या ठेवी पतसंस्थांमध्येच ठेवाव्यात.
आ. संग्राम जगताप म्हणाले, समता पतसंस्थेने आपल्या कामाच्या माध्यमातून स्वतःची एक ब्रॅड व्हॅल्यु तयार केली आहे. विशेषतः समता पतसंस्थेचे चेअरमन यांनी वयाची ७० वी देखील ओलांडली असून महाराष्ट्रातील पतसंस्था बळकटीसाठी रात्रंदिवस हजारो किलोमीटर चा प्रवास करत असतात. त्यांचे कार्य आजच्या तरुण पिढीला लाजवेल असे आहे. तसेच महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळी विषयी निर्माण होणाऱ्या अनेक अडचणी संदर्भात महाराष्ट्र शासनाकडे त्यांच्या वतीने दाद मागवून अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी समता पतसंस्थेच्या अत्याधुनिक सुविधांबद्दल गौरोद्गार काढले. समताच्या उत्कृष्ट कार्यशैलीमुळे समता पतसंस्था नावारूपाला आलेली आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचे नावही उंचावलेले असून ग्राहक सभासदांची सेवा करण्यातही अग्रक्रम मिळविणार आहे. असेही ते म्हणाले,
जिल्हा स्थैर्यनिधी चे उपाध्यक्ष वसंत लोढा, बँकिंग तज्ञ आर.डी. मंत्री, व्यंकटेश मल्टी स्टेट चे अध्यक्ष अविनाश शिंदे, जेष्ठ कॉंग्रेस नेते डी.एम. कांबळे, कायनेटिक कंपनीचे जनरल मॅनेजर शशिकांत गुळवे, जेष्ठ व्यापारी भालचंद्र क्षीरसागर, ट्रान्सपोर्ट व्यवसायिक शिवलिंग डोंगरे, टॅक्स कन्सल्टंट दत्तात्रय लोखंडे, प्रकाश हापसे आदि मान्यवर उपस्थित होते.