राष्ट्रीय महामार्ग १६० च्या ४० प्रकल्पबाधितांना दोन कोटी

राष्ट्रीय महामार्ग १६० च्या ४० प्रकल्पबाधितांना दोन कोटी

2 crore for 40 project affected people of National Highway 160

नामदार काळे यांची शिष्टाई यशस्वी Namdar Kale’s etiquette is successful

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Mon 25 Apr 2022,17 :00Pm.

कोपरगाव: तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग १६० च्या सरकारी जागेवर वास्तव्यास असल्याने भरपाई पासून वंचित राहिलेल्या चाळीस
प्रकल्पबाधितांच्या भरपाई संबंधी ना. आशुतोष काळे यांची शिष्टाई यशस्वी झाल्याने या चाळीस जणांना दोन कोटी २ लाख ५० हजार ५९८ रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे अशी माहिती ना. काळे यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

राष्ट्रीय महामार्ग १६० साठी संपादित करण्यात आलेल्या शासकीय जागा नावावर नसल्याने देर्डे-कोऱ्हाळे व चांदेकसारे येथील ४० प्रकल्पबाधितांना नुकसान भरपाई देण्यात आली नव्हती. या संबंधात या वंचित व नागरिकांनी नामदार आशुतोष काळे यांना शिष्टाई करून न्याय देण्याचे साकडे घातले होते.
याप्रकरणी ना. आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रातांधिकारी गोविंद शिंदे, एन.एच.१६० चे प्रोजेक्ट डायरेक्टर साळुंके यांच्याकडे सातत्याने सरकारी जागा असली तरी राष्ट्रीय महामार्ग १६०मध्ये या नागरिकांचे घर व व्यवसाय उध्वस्त झाला आहे सरकारी जागा असली तरी हे लोक सातत्याने सरकारी कर भरत होते त्यामुळे त्यांची निश्चितच हानी झालेली आहे त्या नुकसानीचे मुल्यांकन करून त्याप्रमाणात या नागरिकांना भरपाई देण्यात यावी अशिष टाईन केली होती अशी शिष्टाई केली होती त्यास येऊन या वंचित ४० नागरिकांना २ कोटी २ लाख ५६ हजार मोबदला देण्यात आला आहे. या नागरिकांनी ना. काळे यांचे आभार मानले आहे.

चौकट :- शासकीय जागेवर वास्तव्यास असल्यामुळे आम्हाला भरपाईपासून वंचित ठेवण्यात आले होते. मात्र नामदार आशुतोष काळे यांनी आम्हाला भरपाई मिळवून देऊन न्याय दिला आहे. ना.आशुतोष काळेंच्या रूपाने देवच धावून आला आहे. अशा भावना प्रकल्पबाधित नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत .

Leave a Reply

You cannot copy content of this page