कोपरगाव बस आगार कर्मचारी कामावर रुजू पाच महिन्यानंतर एसटी पूर्वपदावर

कोपरगाव बस आगार कर्मचारी कामावर रुजू पाच महिन्यानंतर एसटी पूर्वपदावर

Kopargaon bus depot staff resumes work after five months on ST pre-post

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Tue 26 Apr 2022,17 :30Pm.

कोपरगाव : कोपरगाव आगारातील सर्व चालक वाहक कर्मचारी कामावर पुन्हा रुजू झाले आहेत.  एसटी वाहतूक आता पाच महिन्यानंतर पूर्वपदावर येत आहे. कोपरगाव आगाराला दररोज साडेचार लाख ते पाच लाख रुपये उत्पन्न सध्या येत आहे. मात्र ते यादी साडेसात ते आठ लाखावर होते. सध्या कोपरगाव आगाराचा उत्पन्नाच्या बाबतीत जिल्ह्यात चौथा क्रमांक आहे. अशी माहिती आगारप्रमुख अभिजित चौधरी यांनी दिली.

  प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन कोपरगाव आगारातून लांब व मध्यम लांब पल्ल्याच्या कोपरगांव अहमदनगर पुणे, पुणे अहमदनगर कोपरगांव, कोपरगांव लोणी पुणे, पुणे लोणी कोपरगांव, कोपरगांव तळेगांव पुणे, पुणे तळेगांव कोपरगांव, कोपरगाव नाशिक, नाशिक कोपरगाव, कोपरगांव औरंगाबाद, पैठण, धामोरी नाशिक, कोपरगांव श्रीरामपुर, कोपरगाव वैजापुर, संगमनेर, अहमदनगर, शिर्डी धुळे, कोपरगांव बीड, कोपरगांव पंढरपुर, कोपरगांव नांदेड, कोपरगांव शिर्डी हैद्राबाद, पाचोरा, चाळीसगांव, कोपरगाव मुंबई सेंट्रल, कोपरगांव माहुरगड, कोपरगांव त्रंबकेश्वर, कोपरगांव शिरपुर, कोपरगांव सेल्वास या मार्गावर कोपरगांव आगारातुन बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, सुरक्षित प्रवासाला विशेष महत्त्व असे आवाहन आगार प्रमुख अभिजित चौधरी यांनी केले आहे.  बस सूरू झाल्याबदल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page