शेततळ्यातील शेवाळामुळे शेती उत्पादनात घट- डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे

शेततळ्यातील शेवाळामुळे शेती उत्पादनात घट- डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे

Decrease in agricultural production due to algae in farms- Dr. Dnyaneshwar Waghchaure

आंतरराष्ट्रीय कीड रोग तज्ञ International Pest Disease Specialist

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Tue 26 Apr 2022, 19 :00Pm.

कोपरगाव : शेवाळ पाण्याच्या पृष्ठभागावर वाढणारी वनस्पती असुन जिथं क्षारांचे प्रमाण जास्त, जमीन क्षारयुक्त आणि क्षारांचा जमिनीत जास्त निचरा ज्या भागात होतो अशा ठिकाणी पाणी क्षारयुक्त होते व त्यावर शेवाळ वाढते . शेवाळ हे हरितद्रव्य असणारी वनस्पती पाण्यावर वाढत असतानाच त्यावर उपजीविका करणारे जिवाणू हे देखील तिथे वाढू लागतात. त्यामुळे पाणी प्रदूषित होते ते पिण्यास योग्य राहत नाही त्याच बरोबर शेतीत देखील वापरण्यास योग्य राहत नाही. असे प्रदूषित पाणी शेतीला वारंवार शेतकरी देत असतील तर उत्पादन हे घटनारच. हे वेगळ सांगायची गरज नाही. असे प्रतिपादन प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी केले आहे

याविषयी अधिक माहिती देताना डॉ. वाकचौरे म्हणाले, शेवाळ वाढीचा काळ- क्षार युक्त पाणी ,स्वच्छ सूर्यप्रकाश आणि मोठा दिवस व रात्र लहान अशा परिस्थितीमध्ये शेवाळ हे झपाट्याने वाढते आणि पाण्याचे प्रदूषण करत असते. साधारणता मार्च महिन्यानंतर सूर्यप्रकाश स्वच्छ आणि भरपूर असतो तो शेवाळवाढीस पूरक ठरतो तसेच जुलै महिन्यापर्यंत ही परिस्थिती अशीच राहते आणि त्यामुळे शेवाळ हे पाणी साठ्यातील महत्वाचे तन आणि शेतकऱ्यांचे धन खाणारे तन असेच म्हणावे लागेल.

डॉ.वाकचौरे पुढे म्हणाले, शेवाळ वाढीमुळे पाण्याचा सीओडी आणि बीओडी वाढुन पाण्याचा दर्जा खालावतो पाण्यामुळे भाजीपाला, फळ वर्गीय पिके आणि ऊस पिके यांना दिल्यास पिक वाढीस मंदावते आणि उत्पादनात मोठी घट त्यामुळे होते. शेवाळाच्या माध्यमातून आणि शेवाळ ग्रस्त पाण्यामुळे शेतीत शिरकाव होतो. त्यामुळे शेतीतील मित्र जिवाणू यांची संख्या कमी होत जाते आणि त्यांची जागा हानीकारक जिवाणू घेऊन नत्र, स्फुरद , पालाश खतांची साखळी विस्कळीत करते. खतांचा पिकांना फायदा मिळत नाही. त्यामुळे पिके कुपोषित होऊन अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे उत्पादनात घट होते अति प्रमाण वाढल्यास पाण्यातील मासे देखील मरतात या दूषित पाणी प्रदूषणावर बरोबरच मनुष्यप्राणी आणि पर्यावरण यांच्यामध्ये रोग पसरविण्याचे काम करते .

शेवाळ नियंत्रण व उपाय-

शेवाळ नियंत्रणामध्ये कॉपर चा वापर केला जात होता परंतु त्याच्या अति प्रमाणामुळे पिण्यास आणि इतर प्राण्यांना तसेच पर्यावरणाला त्याचा धोका पोहोचू लागला . म्हणून शेवाळ नियंत्रणासाठी शेवाळ खाणारे व शेवाळाचे अन्नद्रव्य विघटन करणारे जिवाणू अश्वमेध विकसित केले असून त्याचा २०१५ पासून हजारो शेतकरी शेतीतील शेवाळ ,शेततळ्यातील शेवाळ, विहिरीतील शेवाळ निर्मूलनासाठी उपयोग करत आहेत. अश्वमेध संशोधन नेहमी शेतकऱ्यांच्या गरजेनुसार आणि भविष्यातील शेतीचा वेध घेत शेतकऱ्यांना पूरक असे नवनवे संशोधन देत असून शेवाळ निर्मूलनासाठी अश्वमेधचे इकोफ्रेश हे वापरावे असे आव्हान  डॉ. ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी शेवटी  केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page