कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये रमजान ईद व धार्मिक स्थळावरील भोंगे अनुषंगाने जातीय सलोखा बैठक

कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये रमजान ईद व धार्मिक स्थळावरील भोंगे अनुषंगाने जातीय सलोखा बैठक

Ethnic Reconciliation Meeting at Kopargaon City Police Station on the occasion of Ramadan Eid and Bhonge at religious places

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Tue 26 Apr 2022, 20 :30Pm.

कोपरगाव : शहर पोलीस स्टेशन येथे आगामी रमजान ईद व धार्मिक स्थळावरील भोंगे अनुषंगाने जातीय सलोखा अबादित ठेवण्याच्या दृष्टीने कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (२६) रोजी सकाळी साडेअकरा ते सव्वा वाजेच्या सुमारास बैठक पार पडली.

यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी , वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता खराटे नायब तहसीलदार श्रीमती मनिषा कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर, आदी मान्यवर हजर होते. सदर बैठकीमध्ये रमजान ईद सण उत्सव शांततेत साजरा करणे बाबत सुचना देवुन मार्गदर्शन करण्यात आले आहे.तसेच धार्मिक स्थळावरील भोंग्याबाबत कोणीही आफवांवर व सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या संदेशावर विश्वास न ठेवता शासन नियमाप्रमाणे परवानगी देणेबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. बैठकी दरम्यान सर्वांनी कायद्याचे पालन करुन रमजान ईद सण उत्सव शांततेत साजरा करु असे आश्वासित केले आहे.

धार्मिक स्थळावरील भोंग्या बाबत आपले विचार व्यक्त करताना शिवसेनेचे विधानसभा संघटक तथा मुस्लिम समाजाचे युवा नेते असलम शेख

प्रशासकिय अधिकाऱ्यांसह मौलाना आसिफ ,मौलाना बशीर अहमद शेख,मौलाना निसार, रियाज शेख सर,अस्लम शेख,फिरोज पठाण, महेमुद सय्यद,अकीश बागवान,फकीर कुरेशी, इमतियाज आत्तार, विजय जाधव, बाळासाहेब आव्हाड, सचिन परदेशी, सुनिल तिवारी, प्रकाश चव्हाण, जितेंद्र रणशुर सतिष काकडे , अनिल गायकवाड, बापु काकडे यांचेसह पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील,मंदिर ट्रस्टी,पुजारी, मशिदीचे मौलाना, हिंदु व मुस्लीम समाजातील प्रतिष्ठीत नागरीक, राजकीय पदाधिकारी व ६० ते ७० कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page