कोपरगांवात पुलक सागरजी महाराज यांचे ४ मे रोजी आगमन

कोपरगांवात पुलक सागरजी महाराज यांचे ४ मे रोजी आगमन

Arrival of Pulak Sagarji Maharaj in Kopargaon on 4th May

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed 27 Apr 2022,13 :30Pm.

कोपरगांव : जैन समाजाचे संत, पुष्पगिरी तिर्थ प्रणेता आचार्य श्री १०८ पुष्पदंत सागरजी महाराज यांचे शिष्य आणि आपल्या उत्कृष्ट प्रवचनाद्वारे भारतभर प्रसिद्ध असलेले भारत गौरव राष्ट्रसंत आचार्य श्री १०८ पुलक सागरजी महाराज स:संघ यांचे आगमन कोपरगांव शहरात येत्या ४ मे रोजी होत आहे.

दिनाक ४ मे रोजी बुधवारी सकाळी ८ वाजता कोपरगांव शहरातील गोदावरी नदी तीरावर संत संघाचे सकल जैन समाज आणि कोपरगांव शहरवासियांचे वतीने भव्य स्वागत करण्यात येणर असून तेथून भव्य अशा मिरवणुकीने संपूर्ण संत संघाला दिगंबर जैन मंदिर येथे आणण्यात येईल अशी माहिती सकल जैन समाजाचे प्रतिनिधी महावीर दगडे,संजय बंब, अशोक पापडीवाल, सुनिल बेदमुथा, प्रविण दोशी, अरविंदशेठ पोरवाल व अंबालालशेठ पोरवाल यांनी दिली.

Leave a Reply

You cannot copy content of this page