पाच गावांच्या पाणी योजनेसाठी पावणे तीस कोटीचा निधी मंजुर-मच्छिंद्र केकाण
Thirty crore fund sanctioned for five village water schemes – Machhindra Kekan
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Fir 29 Apr 2022,16 :30Pm.
कोपरगांव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जलजीवन मिशन योजना माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे आणि भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या पाठपुराव्यातुन धारणगाव, मुर्शतपुर, जेउरपाटोदा, हिंगणी आणि चांदगव्हाण या संयुक्त पाणी पुरवठा योजनेसाठी २९ कोटी ६२ लाख रूपयांचा निधीतुन कामे मार्गी लागणार असल्याचे प्रतिपादन माजी सभापती मच्छिंद्र केकाण यांनी केले.
श्री. केकाण म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली धारणगाव, मुर्शतपुर, जेऊरपाटोदा, हिंगणी व चांदगव्हाण या पाच गावच्या प्रतिष्ठीत नागरीक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सर्व अधिकारी यांचे शिष्टमंडळाने मंत्रालय स्तरावर अधिवेशन काळात पाठपुरावा केला.
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे येथील राष्ट्रीय राज्य व जिल्हा तालुका मार्गाच्या रस्ते कामाबरोबरच हया पाणी योजनासाठी निधी मिळावा म्हणून शिर्डी येथे मागणी केली होती. केंद्राच्या जल जीवन मिशन अंतर्गत या पाणी योजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६० टक्के तर राज्य शासन स्तरावर ३० टक्के आणि संबंधीत गांवचा १० टक्के अशा विगतवारीनुसार २९ कोटी ६२ रूपयांचा निधी मंजूर झाला त्यासाठीचा सर्व पाठपुरावा हा भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांचाच आहे असेही ते शेवटी म्हणाले.