कोपरगावसाठी तीन शहरी आरोग्य स्वास्थ्य सेंटर मंजुर– ना. आशुतोष काळे

कोपरगावसाठी तीन शहरी आरोग्य स्वास्थ्य सेंटर मंजुर– ना. आशुतोष काळे

Three Urban Health Centers approved for Kopargaon – No. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Fir 29 Apr 2022,17 :30Pm.

कोपरगाव: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या माध्यमातून कोपरगाव शहरासाठी तीन शहरी आरोग्य स्वास्थ्य सेंटर मंजुर करण्यात आल्याची माहिती श्री साई संस्थान अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी नामदार काळे यांनी ग्रामीण रुग्णालयाला १०० बेडचा उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवला आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत तीन शहरी आरोग्य स्वास्थ्य सेंटर केले आहेत.

या शहरी आरोग्य स्वास्थ्य सेंटरमध्ये १ डॉक्टर, १ परिचारिका, १ सहाय्यक कर्मचारी व १ औषध निर्माता असे एकूण ४ आरोग्य कर्मचारी नागरिकांना मोफत आरोग्यसेवा देणार आहे. जवळपास १५ते २० हजार लोकसंख्या विचारात घेवून कोपरगाव शहरातील खडकीपरिसर, अंबिकानगर परिसर तसेच सुभाषनगर शहरी आरोग्य स्वास्थ्य सेंटर उभारली जाणार आहेत असे ना. आशुतोष काळे यांनी सांगितले. त्याबद्दल त्यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहे.

मुख्याधिकारी शांताराम गोसावी, आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्या समवेत राष्ट्रवादीचे सुनील गंगुले, नवाज कुरेशी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, इम्तियाज अत्तार, शैलेश साबळे, किशोर डोखे, विजय शिंदे, चांद पठाण, योगेश नळे, अमोल गिरमे, संदीप वाघ तसेच खडकी, अंबिकानगर व सुभाषनगर येथील कार्यकर्त्यांनी परिसराची संयुक्त पाहणी केली.

Leave a Reply

You cannot copy content of this page