१९ कोटी थकबाकी ; गायत्री कंपनीविरोधात उपोषणाचा सहा दिवस
19 crore arrears; Six days of fast against Gayatri Company
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Mon 2 May2022,19.20
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या गायत्री कंपनीने व्यावसायिकांचे १९ कोटी रुपये थकवून गाशा गुंडाळयाची तयारी सुरू केली हे लक्षात येताच व्यावसायिकांनी गायत्री कंपनीचे गेट बंद केले. या आंदोलनाचा आज सहावा दिवस होता. अशी माहिती सुधाकर होन व बाजीराव होन यांनी दिली. पैसे मिळावे यासाठी त्यांनी प्रशासनाला साकडे घातले आहे.
व्यावसायिक व शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकून समृद्धी महामार्गाचे काम करण्यासाठी डंपर,ट्रॅक्टर, जेसीपी क्रेन, आदी वस्तू बँक फायनान्स पतसंस्था यांच्याकडून कर्ज काढून घेतल्या. गायत्री कंपनीने या व्यावसायिकांचे कोट्यावधी रुपये थकवले. वेळोवेळी केलेल्या आंदोलनामुळे व्यवसायिकांच्या पदरात काही प्रमाणात पैसे मिळाले.
मात्र आता गायत्री कंपनीकडूननही दुसऱ्या कंपनीकडे हे काम गेल्यामुळे या कंपनीने परिसरातील व्यवसायिकांचे पैसे थकविण्यास सुरुवात केली.१९ कोटी रुपये या कंपनीने सध्या थकवले आहे. आता व्यवसायिक आक्रमक झाले असून या कंपनीत असलेले गायत्री कंपनीचे सर्व सामान गेट बंद करून ठेवले आहे. सहा दिवसांपासून गायत्री कंपनीच्या ऑफिस समोर चक्री उपोषण व्यवसायिकांनी सुरू केले आहे.
नाशिक येथे समृद्धीचे एम. एस. आर. डी. सी. चे महाव्यवस्थापक मोपोवार यांच्याशी याबाबत व्यासायिकांनी संपर्क केला प्रत्यक्ष भेट घेतली असता त्यांनी केवळ तोंडी आश्वासन दिले. एकुण ७५ व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपये थकले आहेत. असून संबंधित कंपनीला थकलेल्या व्यवसायिकांची माहिती कळवण्यासाठी मोपोवार यांनी सांगितले होते. मात्र गायत्री कंपनीचे अधिकारी जाणीवपुर्वक टाळाटाळ करीत आहेत.
हे काम आता राज कंट्रक्शन कंपनीला देऊन टाकले आहे. त्यामुळे आता गायत्री कंपनी या व्यावसायिकांचे पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे.
काल राज कंट्रक्शन कंपनीला देखील व्यवसायीकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. येत्या दोन दिवसात जर गायत्री कंपनीने आमचे थकवले पैसे दिले नाही तर राज कंट्रक्शन कंपनीला देखील कोपरगाव परिसरात काम करून देणार नसल्याचे व्यावसायिकांच्या वतीने सांगण्यात आले.
Post Views:
304