पाच नंबर साठवण तलाव निविदा स्थगितीची मागणी न्यायालयाने फेटाळली

पाच नंबर साठवण तलाव निविदा स्थगितीची मागणी न्यायालयाने फेटाळली

The court rejected the demand for suspension of tender for storage number five

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Tue 3 May 2022,17.20
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : ५ नंबर साठवण तलाव,पाणी आरक्षण व साठवण तलावाच्या निविदेस विरोधकांनी केलेली स्थगितीची मागणी न्यायालयाने फेटाळली असल्याची माहिती हस्तक्षेप याचिका कर्ते विरेन बोरावके यांनी दिली आहे.

कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यासाठी ना. आशुतोष काळे यांनी पाच नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळवली व वाढीव पाणी आरक्षित करण्यासाठी शासनाकडून मंजुरी देखील मिळविली. कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. मात्र धारणगाव, ब्राम्हणगाव गावातील कार्यकर्त्यांनी न्यायालयात पाच नंबर साठवण तलाव, प्रसिद्ध झालेली निविदा व मंजूर करण्यात आलेले वाढीव पाणी आरक्षण स्थगित करावे अशा आशयाची याचिका दाखल केली होती.

त्याविरोधात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले व नगरसेवक विरेन बोरावके यांच्या नावे हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली होती. त्याबाबत सोमवारी (मे २) रोजी सुनावणी होवून दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेतील मुद्दे ग्राह्य धरून ५ नंबर साठवण तलाव, प्रसिद्ध झालेली निविदा व मंजूर करण्यात आलेले वाढीव पाणी आरक्षण रद्द करावे ही विरोधकांची मागणी औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली आहे. याकामी ॲड. शाम पाटील, ॲड. मिलिंद पाटील, अड. व्ही. डी.साळुंके ॲड. आर.एल. कुटे,ॲड. ए.बी. काळे व ॲड. डी.आर.काळे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

You cannot copy content of this page