एकता आणि अखंडतेची शिकवण सर्वांनी आत्मसात करावी- सौ. स्नेहलता कोल्हे

एकता आणि अखंडतेची शिकवण सर्वांनी आत्मसात करावी- सौ. स्नेहलता कोल्हे

The teaching of unity and integrity should be assimilated by all. Snehalta Kohle

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Tue 3 May 2022,17.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव : एकता आणि अखंडतेची शिकवण सर्वांनी आत्मसात करावी असे मत भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी मंगळवारी सकाळी ईदगाह मैदान येथे मुस्लीम बांधवांना रमजान ईद निमीत्त शुभेच्छा व्यक्त केले.

त्यांनी मुस्लीम बांधवांची व्यक्तीगत भेट घेवुन शुभेच्छा दिल्या व अक्षय तृतीया निमित्त हिंदू बांधवांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या.          

 प्रारंभी गटनेते रविंद्र पाठक यांनी प्रास्तविक केले. याप्रसंगी मौलाना शेख, हाजी सद्दाम सय्यद, रियाज शेख, लकीर सच्यद, रहिम शेख अहमद बेकरीवाले, मन्सुर शेख, अकबरलाला शेख, निसार शेख, अन्सार शेख, अकिब शेख, नदिम मन्सुरी,  ॲड. दारूवाला, पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.        

सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी मुस्लीम बांधवांच्या उन्नत्तीसाठी सातत्याने प्रयत्न करून त्यांच्या प्रत्येक अडी अडचणींत मोलाची साथ दिली. संजीवनी उद्योग समुह शहरवासियांच्या प्रत्येक संकटात सर्वप्रथम धावून आलेला आहे. कुराण व गीता सर्वश्रेष्ठ ग्रंथ असल्याचेही त्या म्हणाल्या. शेवटी अरिफ कुरेशी यांनी आभार मानले.  

Leave a Reply

You cannot copy content of this page