डॉ. सुभाष मुंदडा यांना महेश गौरव पुरस्कार

डॉ. सुभाष मुंदडा यांना महेश गौरव पुरस्कार

 Mahesh Gaurav Award to Dr. Subhash Mundada

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Tue 3 May 2022,20.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : डॉ. सुभाष मुंदडा यांना (वैद्यकीय) महेश गौरव पुरस्कार अहमदनगर जिल्हा माहेश्वरी सभा आयोजित सोहळ्यात १ मे रोजी माहेश्वरी सभा प्रदेशाध्यक्ष किशन भन्साळी यांच्या हस्ते देण्यात आला.

गेली पन्नास वर्षापासून वैद्यकीय सेवेत केलेले निस्वार्थी कार्य , नगरसेवक असताना केलेले कार्य व मर्चंट बॅंकेचे चेअरमन असताना केलेले कार्य तसेच भुज (गुजरात )येथे भूकंप आलेला असताना भूज येथे केलेली वैद्यकीय सेवा तसेच रुग्णांसाठी लायन्स व लिओ क्लबच्या माध्यमातून प्लास्टिक सर्जरी शिबिरात केलेले कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी कोपरगावातील माहेश्वरी समाजाचे पदाधिकारी दिलीप बजाज, राजेंद्र राठी ,विनोद डागा, संतोष मुंदडा ,रतनलाल मुंदडा उपस्थित होते

Leave a Reply

You cannot copy content of this page