श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल; सर्वरोग निदान आरोग्य शिबीर ४५० रुग्णांची तपासणी

श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल; सर्वरोग निदान आरोग्य शिबीर ४५० रुग्णांची तपासणी

Sri Janardhan Swamy Hospital; All Diagnosis Health Camp Examination of 450 Patients

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Tue 3 May 2022,18.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यात नगर मनमाड हायवे लगत असणाऱ्या श्री जनार्दन हॉस्पिटल मध्ये सोमवारी (२मे)  रोजी शिबीर ठेवण्यात आले होते.या शिबिरात एकूण ४५० रुग्णांनी नोंदणी करून शिबिराचा फायदा घेतला.

यावेळी राष्ट्संत जनार्दन स्वामी फाउंडेशनचे चेअरमन चांगदेव कातकडे, एच.आर सचिन जानवेकर, डॉ. प्रसाद उंबरकर, मार्केटिंगचे महेश रक्ताटे,उत्तम भागवत,डॉ.सायली ठोंबरे होते. या शिबिरात तज्ञ डॉ. स्त्रीरोगतज्ज्ञ स्नेहल भाकरे, ह्र्दयशस्त्रक्रिया तज्ञ डॉ.नीरज काळे, न्युरोसर्जन डॉ.प्रसाद उंबरकर,नेत्ररोग तज्ञ डॉ. प्रशांत सगळगीळे, एम.डी.मेडिसीन तज्ञ डॉ.सायली ठोंबरे, बालरोगतज्ज्ञ तज्ञ डॉ.अनंतकुमार भांगे,इत्यादी डॉक्टर उपस्थित होते. 

यात मणक्याचे आजार ,हाडाचे आजार, किडनीस्टोन,डोळ्याचे आजार, लहान मुलांचे आजार, अ‍ॅन्जिओग्राफी, अ‍ॅन्जिओप्लास्टी, एक्सरेची मोफत तपासणी झाली..

शिबिरात बी.पी., ई.सी.जी., शुगर,या तपासण्या मोफत केल्या. सवलतीच्या माफक दरात एम.आर.आय व सिटी स्कॅन करुन देण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शिबिरातुन रुग्णाचा आजार निष्पन्न होऊन ३५ रुग्ण ऍडमिट ॲडमिट  करण्यात आले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page