कोपरगाव हे देशासाठी उदाहरण ठरले पाहिजे अभिनेता – सोनू सूद

कोपरगाव हे देशासाठी उदाहरण ठरले पाहिजे अभिनेता – सोनू सूद

Kopargaon should be an example for the country Actor – Sonu Sood

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on :Wed 4 May 2022,15.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : मी तुम्हाला एक आठवड्याची मुदत देतो, बसा, विचार करा, कोपरगावसाठी काय करायचे तुम्ही सांगा, कुठे काय पाहिजे ते सांगा, हे सर्व तुम्हाला सांभाळायचे आहे. तेव्हा तुमचा त्यात सहभाग काय आहे हेही मला सांगा, बघा मी तुम्हाला सर्वांना कामात व्यस्त करतो. तुम्हाला सांगायचे आहे आणि मला फक्त ते करायचे आहे हे लक्षात ठेवा यासाठी मी तुम्हाला आठवड्याची मुदत देतो इतरांप्रमाणे मी तुम्हाला वाट पाहायला लावणार नाही आठव्या दिवशी मी येथे हजर होतो. असे आश्वासन मोठ्या पडद्यावरील खलनायक खऱ्या जीवनातील नायक सिनेअभिनेता सोनू सूद यांनी कोपरगाव येथे शहरातील डॉ. एपीजे अब्दुल कलाम हॉस्पिटल मधील २६ आशा सेविकांना बुधवारी (४मे) रोजी नगरपालिका फायर स्टेशन येथे सायकल वाटप कार्यक्रमात बोलतांना केले.

 

प्रारंभी प्रास्ताविक नगरपालिका मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी केले. विनोद राक्षे यांनी अभिनेता सोनू सूद यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. पोलीस निरिक्षक वासुदेव देसले यांनी अभिनेता सोनू सूद यांच्या दातृत्वाचा गौरव केला.

सोनू सुद पुढे म्हणाले, जे लोक आपल्याला चिंता करू नका मी येतो सर्व ठीक करून देतो असे सांगतात ते कधीच काही करत नाहीत कारण ते त्यांच्या कामात व्यग्र होऊन सर्व विसरून जातात. अडीच वर्षांपूर्वी मी काहीच नव्हतो त्यावेळेस तुम्ही मला विचारले असते तर मी तुम्हाला काही सांगू शकलो नसतो परंतु ज्या वेळेस साडेसात लाख लोकांची घरवापसी केली. त्यामुळे मी त्यांच्याशी जोडलो गेलो.त्यात सर्व स्तरातील लोकांमुळे आज काश्मीर ते कन्याकुमारी माझे एक नेटवर्क सिस्टीम उभी राहिली त्या माध्यमातून मी प्रत्येक लहान मोठ्या शहरातील व गावाशी जोडला गेलो आहे. आम्ही त्यांना जे काम देतो ते त्यांच्या जबाबदारीवर आज पार पाडीत आहे तसेच जोपर्यंत आपली जोडले जात नाही तोपर्यंत हे होणार नाही सर्वजण जोडले गेले तर एक ताकद निर्माणहो मोठे काम करता येते लोक शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला आले तर ते कोपरगाव ला तुमचे काम बघण्यासाठी पुन्हा आली पाहिजे मी आता तुमच्या बरोबर जोडला गेलो आहे वर्षातील ३६५ दिवस आपली अडचण सोडविण्याचा मी प्रयत्न करेन तुम्ही फक्त काम करण्यासाठी तयार व्हा मी तुम्हाला सर्व देतो अशी ग्वाही अभिनेता सोनू सूद यांनी शेवटी दिली .

यावेळी सौ स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, सिने क्षेत्रामध्ये अनेक मोठमोठे दिग्गज कलाकार आहेत स्वतः साठी जगता जगता गरीब व गरजूंसाठी जगता आले पाहिजे असा स्वभाव सोनू सूद यांचा असल्याने ते ते अडचणीत संकटकाळी लोकांसाठी धावून जातात ते अध्यात्मिक आहेत, सामाजिक आहेत, त्यांना राजकीय ज्ञान भरपुर आहे. सिने क्षेत्राप्रमाणेच त्यांचे नाव व इतर क्षेत्रातही उज्वल होईल कारण त्यांच्या पाठीमागे गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत. सामाजिक कार्याचे भान ठेवणारे व त्यातून सर्वसामान्य गोरगरिबांना मदतीचा हात देणारे सिनेक्षेत्रात सोनू सूद सारखे काही बोटावर मोजण्याइतकेच असल्याचे गौरवोद्गार त्यांनी शेवटी व्यक्त केले.

व्यासपीठावर भाजपा प्रदेशाध्यक्ष संस्थेला टाकूनही सौ स्नेहलता कोल्हे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, कार्यक्रमाचे आयोजक विनोद राक्षे, बबलू वाणी, संदीप देवकर, राजेंद्र सोनवणे, बिल्डर याकूब शेख, डॉ. अजीम शेख, डॉ. कांडेकर मॅडम आदीसह अशा सेविका अंगणवाडी सेविका नगरपालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार पालिका अधिकारी महारुद्र गलाट यांनी व्यक्त केले. आरोग्य विभाग सुनील आरणे व नगरपालिका कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

चौकट
ज्या मुलांना आई-वडील नाहीत त्यांच्यासाठी अनाथ आश्रम व ज्यांना मुले नाहीत, त्यांची देखभाल करणारे कोणी नाही त्यांना ती कमतरता जाणवू नये यासाठी सुंदर त्यांना असा वृद्धाश्रम देऊ. ज्या महिलांना हाताला काम पाहिजे ज्यांची शिकायची इच्छा आहे त्यांना ते साहित्य देवू- सोनू सूद

Leave a Reply

You cannot copy content of this page