के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा.

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा..

वृत्तवेध ऑनलाईन 17 July 2020

By : Rajendra Salkar

कोपरगाव : कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित कोपरगाव येथील के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा १२ वी चा निकाल उत्कृष्ट लागला आहे. पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी २०२० मध्ये घेतलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल नुकताच इंटरनेट वर जाहीर झाला असून के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने उज्ज्वल निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे.

१२ वी विज्ञान शाखेचा निकाल ९८.५४ % लागला असून खालील प्रमाणे तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत. कु. रुद्रभाटे ऋचा उदय या विद्यार्थिनीला गणित या विषयात १०० पैकी १०० गुण मिळालेले आहे.
विज्ञान शाखा निकाल (९८.५४ %)
रुद्रभाटे ऋचा उदय (८९.६९ %)प्रथम,
जाधव संकेत शिवाजी (८७.६९ %) द्वितीय, शेटे पल्लवी योगेश (८५.८४%) तृतीय,
१२ वी वाणिज्य शाखा (९१.१८%)

आभाळे कविता बाबासाहेब (८९.८४%) प्रथम, चौधरी अजय नारायण (८९.०७ %)द्वितीय
३ देसाई पूजा अनिल (८८.१५ %) तृतीय

१२ वी कला शाखा निकाल (७२.१०%)
शिंदे दीपक रतन (८२.६१ %) प्रथम
दोडके सपना बबन ( ७९.३८%) %द्वितीय, साबळे गौरी मधुकर (७७. ६९%)तृतीय

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, उपाध्यक्ष रामदास पा. होन, सचिव अॅड. संजीव कुलकर्णी, चंद्रशेखर कुलकर्णी संदीप रोहमारे, सुजित रोहमारे संस्थेचे सर्व विश्वस्थ तसेच प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. नारायण बारे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page