आरोप सिद्ध करा, अन्यथा आम्हाला अब्रुनुकसानीचा दावा ठोकावा लागेल – पराग संधान

आरोप सिद्ध करा, अन्यथा आम्हाला अब्रुनुकसानीचा दावा ठोकावा लागेल – पराग संधान

Prove the allegations, otherwise we will have to sue Abrunuksani – Parag Sandhan

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Wed 11 May 2022, 17.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : पाच नंबर साठवण तलावाचे सर्व श्रेय आपल्यालाच मिळावे यासाठी आमदार काळे गट बिनबुडाचे, बेछुट आरोप करत कोल्हे यांना बदनाम करण्याचा सुरु केलेला उद्योग त्यांनी थांबवावा. ते कोणते आठ वकिल आहेत. त्यांची  नावे जाहीर करावीत,  आरोप सिद्ध करावा, किंवा माफी मागावी, अन्यथा आम्हाला अब्रुनुकसानीचा दावा ठोकावा लागेल असा इशारा अमृत संजीवनी चे अध्यक्ष पराग संधान या पत्रकार परिषदेतून दिला आहे.

 

पाच नंबर तलावाची मंजुरी व वाढीव पाणी याबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरून काळे गटाने थेट कोल्हे गटावर केलेल्या आरोपाचे खंडन करताना बुधवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पराग संधान बोलत होते

याबाबत पराग संधान म्हणाले की,
नगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्यासाठी सर्व साठवन तलावांना स्व. शंकरराव कोल्हे यांनी जागा मिळवून दिली. तात्कालीन नगराध्यक्षा ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई यांनी २०१४ साली ५ नंबर तलावाचा प्रस्ताव व ठराव मंजूर करून घेतला. तेंव्हा ठरावाला मंजूरी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी दिली होत. आराखडा तयार करण्यासाठी सात लाख रुपये देखील भरले होते. आजही पाच नंबर साठवण तलावासाठी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी बहुमताने मंजुरी दिली आहे. हे नाकारता येणार नाही असे असताना पाच नंबर साठवण तलावाचे सर्व श्रेय आपल्यालाच मिळावे या भावनेतून काळे गटाकडून सातत्याने पाच नंबर साठवण तलावावरून कोल्हे गटाची बदनामी करण्यात येत आहे.
सदर याचिकेबाबत अभ्यास केला असता मुळात तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपले सिंचनाचे एका आवर्तनाचे पाणी कमी होईल. या भीतीपोटी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेचा अर्थाअर्थी पालिकेच्या पाच नंबर साठवण तलावाची कुठलाही काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे याचिकेवरून काळे गटाने केलेले आरोप निखल्लास खोटे असून बिनबुडाचे आहेत. मुळात कोल्हे यांचे नाव घेतल्याशिवाय काळे पार्टीचे राजकीय गाडा पुढे चालत नाही व दिवसही जात नाही अशी मिश्किल टीका संधान यांनी केली.

काळे गट हे धादांत खोटे आरोप करून कोल्हे यांना बदनाम करत आहेत. समन्यायी कायदा झाला त्यावेळेस आमदार अशोक काळे होते तेथूनच तालुक्याच्या पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचे वाटोळे झाले. निळवंडे चे पाणी पिण्यासाठी कोपरगाव शहराला आले असते तर तालुक्याच्या सिंचनाचे एका वर्तन निश्चित वाढले असते असे असतानाही निवडणुकीच्या काळात आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराला पिण्यासाठी निळवंडेच्या पाण्याचा एक थेंबही जाऊ देणार नाही अशी ग्वाही दिली होती आजही ते त्यावर ठाम आहे. असेच दिसून येते. आता तुम्ही साई संस्थान चे अध्यक्ष झाला आहात तेंव्हा निळवंडे चे पाणी शिर्डी साई भूमीला आणा, आणि कोपरगावकरांनाही पाजा व आपले पाप धुऊन काढा अशी विनंती पराग संधान यांनी पत्रकार परिषदेचे मधून आमदार काळे यांना शेवटी केली.
पत्रकार परिषदेसाठी भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले, गटनेते रवींद्र पाठक, स्वप्निल निखाडे, विवेक सोनवणे भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

 

चौकट
काळे पितापूत्र यांचे आजवरचे राजकारण पहाता कोल्हेंच्या जिरवाजिरवीत कोपरगाव वासियांचीच जिरवाजिरव करण्याचे काम सध्या सुरु असून पाच नंबर तलावाची याचिका फेटाळली हा अपप्रचार देखील खोटा असल्याचे संधान यांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page