जैन राष्ट्रसंत पूलक सागर महाराजांच्या विचारांनी उर्जा मिळते- स्नेहलता कोल्हे

जैन राष्ट्रसंत पूलक सागर महाराजांच्या विचारांनी उर्जा मिळते- स्नेहलता कोल्हे

Energy comes from the thoughts of Jain Rashtrasant Pulak Sagar Maharaj- Snehalta Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Wed 11 May 2022, 18.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव : जैन राष्ट्रसंत व भारत गौरव, प्रखर वक्ते पूलक सागर महाराज यांचे विचार अत्यंत प्रभावी असुन त्यातुन आपल्याला उर्जा मिळते असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी बुधवारी पुलक सागर महाराज यांच्या वाढदिवशी वृक्षारोपण करतांना केले.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पेस्टीसाईडस असोसिएशनचे कैलास ठोळे, ज्येष्ठ विधीज्ञ जयंत जोशी, संतोष गंगवाल, मणिकचंद ग्रुपच्या शोभा धाडीवाल, पंच अशोक पापडीवाल, रेखा काले, सत्येन मुंदडा, विजय बंब, पी. सी. ठोळे, पंच महावीर दगडे, शोभना ठोळे, मंजु काले, दिलीप अजमेरे, महावीर काले, अतुल काले, अजित लोहाडे, जितेंद्र कासलीवाल, फुलचंद पांडे, विशाल बडजाते, सुशांत घोडके, सचिन अजमेरे यांच्यासह जैन बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते.         

  सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, कोपरगांव आणि जैन समाज एक अतुट नाते आहे. येथील महावीर मंदिरात आजवर अनेक जैन राष्ट्रसंतांनी हजेरी लावून आपल्या प्रभावी विचारांनी सर्व समाजातील घटकांना उच्च विचारांची प्रेरणा देवुन योग्य दिशा देण्याचे काम केले आहे. कोपरगांववासियांना त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य लाभले हा अनमोल योगायोग आहे, वाढत्या तपमानाचा पारा कमी करण्यासाठी वृक्षारोपण अत्यंत गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या, शेवटी अतुल काले यांनी आभार मानले.  

Leave a Reply

You cannot copy content of this page