विरोध करण्याचा डाव फसल्यामुळे अब्रू नुकसानीची भाषा- सुनील गंगुले

विरोध करण्याचा डाव फसल्यामुळे अब्रू नुकसानीची भाषा- सुनील गंगुले

Language of disgrace due to failure of opposition – Sunil Gangule

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Thu 12 May 2022, 18.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : ५ नंबर साठवण तलाव होवू नये यासाठी पडद्यामागून विरोध करण्याचा डाव फसल्यामुळे मनस्तापापायी अब्रू नुकसानीची भाषा कोल्हे गट करीत असल्याची टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

पाच नंबर साठवण तलाव बाबत बिनबुडाच्या बेछुट आरोप सिद्ध करा, असे आव्हान देत अन्यथा आम्हाला अब्रुनुकसानीचा दावा ठोकावा लागेल असा इशारा कोल्हे गटाचे पराग संधान यांनी काळे गटाला दिला होता त्यावर उत्तर देताना गंगुले बोलत होते.

कोल्हे गटाने आपल्या धारणगाव, ब्राम्हणगाव गावातील कार्यकर्त्याकरवी न्यायालयात ५ नंबर साठवण तलाव, प्रसिद्ध झालेली निविदा व मंजूर करण्यात आलेले वाढीव पाणी आरक्षण स्थगित करावे अशा आशयाची याचिका औरंगाबाद खंडपीठाने नुकतीच फेटाळल्याने कोल्हे यांचा डाव फसला आहे. ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी रुपये निधी मिळविला आहे. त्यासाठी वाढीव पाणी देखील त्यांनी मंजूर करून घेतले आहे. त्यामुळे हे सर्व श्रेय जनतेने ना. आशुतोष काळे यांनाच दिले आहे. हे कोल्हे गटाला स्वस्थ बसू देत नाही.त्यामुळे त्यांना सारवासारव करावी लागत असल्याचे गंगुले यांनी म्हटले आहे.

चौकट :- ५ नंबर साठवण तलाव होवू नये यासाठी समृद्धीच्या ठेकेदारावर राजकीय वजन वापरून दबाव कोणी आणला होता? कधी पडद्यामागून तर कधी न्यायालयातून शहरविकासाला विरोध करणाऱ्या कोल्हे गटाने शहरातील नागरिकांची माफी मागावी. अन्यथा शहरातील नागरिक सगळा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही- सुनील गंगुले

Leave a Reply

You cannot copy content of this page