धर्मवीर संभाजी महाराज कधीही न हारणारा अजिंक्य योद्धा-स्नेहलता कोल्हे 

धर्मवीर संभाजी महाराज कधीही न हारणारा अजिंक्य योद्धा-स्नेहलता कोल्हे

Dharmaveer Sambhaji Maharaj is an invincible warrior who never loses

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Sat 14 May 2022, 15.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव :  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजानंतर धर्मवीर संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते त्यांनी आपल्या पराक्रमाच्या शौर्यगाथांची सुरूवात अतिशय कमी वयात केली ते पराक्रमी योध्दे होते, म्हणूनच त्यांनी लढलेल्या लढाईमध्ये कधीही हार पत्करली नाही असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.

 शहरातील धारणगांव रोडवरील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळयाला जयंतीनिमीत्त शनिवारी अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी गटनेते रविंद्र पाठक यांनी प्रास्तविक केले. भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या आठवणींना उजाळा दिला. शहराध्यक्ष दत्तात्रय काले म्हणाले की, पराक्रम हीच धर्मवीर संभाजी महाराजांची ओळख होती.     

    सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, धर्मवीर संभाजी महाराजांच्या खांद्यावर हिंदवी स्वराज्याचा भार अतिशय लहान वयात पडला त्यांनी न डगमगता २१० लढाया लढुन प्रत्येकामध्ये विजयश्री खेचुन आणलेली आहे. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी बुधभूषण, नखशिख, नायिकाभेद या तीन संस्कृत ग्रंथाचे लेखन केले. विविध तेरा भाषांचे ज्ञान त्यांना अवगत होते या पराक्रमी महापुरूषाची जयंती देशभर साजरी होत आहे.        

  याप्रसंगी स्वप्नील निखाडे, अशोक लकारे, दिपक जपे, जितेंद्र रणशुर, शिवाजी खांडेकर, खालीक कुरेशी, फकिर महंमद पहिलवान, सोमनाथ म्हस्के, सतिष रानोडे, विजय चव्हाणके, वासुदेव शिंदे आदि उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page