कोपरगावात डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वच्छता अभियान

कोपरगावात डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वच्छता अभियान

In Kopargaon, Dr. Sanitation campaign of Dharmadhikari Pratishthan

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Sun 15 May 2022, 18.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव  : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने स्वच्छता अभियान राबवून दोन किलोमीटर अंतरात सुमारे आठ टन कचरा गोळा करीत गावकऱ्यांना स्वच्छतेचे धडे दिले. त्यामुळे परिसर चकाचक झाला.

स्वछता अभियानात भाग घेणाऱ्या कुठल्याही व्यक्तीचे नाव न कळू देता  शहरातील बस स्टँड व गोकुळ नगरी ते निवारा कॉर्नर ते खडकी रस्त्याची  स्वच्छता करण्यात आली प्रत्येक नागरिकाने आपापल्या भागात स्वतःहून असे अभियान राबवावे.                        डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा ता. अलिबाग जिल्हा रायगड हे एक सेवाभावी व समाजाभिमुख व लोकोपकारी उपक्रम राबविणारेे प्रतिष्ठान आहे. प्रतिष्ठान तर्फे विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड व संवर्धन, जलपुनर्भरण ,आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर इत्यादी तसेच गरजूं विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरवणे, साक्षरता वर्ग चालवणे, विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन असे उपक्रम प्रतिष्ठान मार्फत राबवले जातात. दि.१४ मे हा दिवस पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने आज १५ मे रोजी प्रतिष्ठानने स्वच्छता अभियान  आयोजित केले होते.                                           

या अंतर्गत आज नगर जिल्ह्यातील कोपरगांव येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियान सकाळी ७ वा. सुरू झाले व ११ वाजेपर्यंत शिस्तबद्ध रीतीने पूर्ण झाले. यात प्रतिष्ठानच्या ९० ते १०० सदस्यांनी  सहभाग नोंदवत कोपरगांव बस स्टॅड व डेपो परिसर, गोकुळ नगरी रोड ते टाकळी रोड खडकी पर्यंत इत्यादि १६००० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेले बसस्थानक, २ किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करून ८ टन कचरा गोळा केला. त्यास नगरपालिका व बस स्थानक चे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले ,कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.                                 

या प्रसंगी नगर सेवक वैभव गिरमे, जनार्दन कदम व बस स्थानक आगार प्रमुख  अभिजित चौधरी व नगर पालिकेचे मुख्य आधिकारी शांताराम गोसावी  कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी प्रतिष्ठानचे हे कार्य अत्यंत स्तुत्य व अनुकरणीय आहे असे सांगून प्रतिष्ठान च्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page