गोवंश जातीच्या जनावरांचे मांस व कातडी १५ हजाराचा मुद्देमाल आरोपी सह ताब्यात  

गोवंश जातीच्या जनावरांचे मांस व कातडी १५ हजाराचा मुद्देमाल आरोपी सह ताब्यात

Meat and hides of cattle were seized along with Rs 15 Thousand

कोपरगाव :  शहरातील आयेशा कॉलनी येथे गुरुवार दि. १२ मे  रोजी गोवंश जातीच्या जनावरांचे मांस व कातडी असा एकूण १५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमालासह एका आरोपीस शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली.

शहरातील आयेशा कॉलनी येथील आरोपी मुक्तार गफार कुरेशी व उजेब मजीब कुरेशी हे दोघे गुरुवार दि. १२ मे रोजी सकाळी ६.४५ वाजता आयेशा कॉलनीमधील मुक्तार कुरेशी यांच्या घराच्या आडोशाला धारदार हत्याराने गोवंश जातीच्या जनावरांच्या कत्तलीस बंदी असताना देखील बेकायदेशीररीत्या कत्तल करून जनावरांचे मांस व जनावरांची कातडी १०० रुपये प्रति किलोप्रमाणे १५० किलो अर्धवट कापलेले १५ हजार रुपये किमतीचे गोवंश विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगता आढळून आला.

पोलीस कॉन्स्टेबल संभाजी भिमराज शिंदे शहर पोलीस यांच्या फिर्यादीनुसार शहर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १२५ / २०२२ भा.द.वि. कलम ४२९ महा प्राणी संरक्षण कायदा व सुधारणा अधिनियम २०१५ चे कलम ५ (अ) (ब) (क) ९ (अ) व भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित ठोंबरे यांनी भेट दिली . तेथून ५०० रुपये किमतीच्या दोन कुऱ्हाडी व दोन लोखंडी सुरे जप्त करण्यात आले आहेत. यातील मुक्तार गफर कुरेशी या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर उजेब मजीब कुरेशी हा आरोपी फरार झाला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक ए. एम दारकुंडे हे करीत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page