परिचारिका रुग्णसेवेचा आधारस्तंभ: प्रा.इरशाद अली 

परिचारिका रुग्णसेवेचा आधारस्तंभ: प्रा.इरशाद अली

Pillar of Nursing Patient Service: Prof. Irshad Ali

राष्ट्संत जनार्दन स्वामी महाविद्यालयात परिचारिका दिन Nursery Day at Rashtrasant Janardan Swamy College

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Sun 15 May 2022, 18.20
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : -१२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून पाळला जातो. इसवी सन १८५४साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका(नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून पाळला जातो.

राष्ट्संत जनार्दन स्वामी  परिचारिका महाविद्यालयात १२ मे  रोजी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य इरशाद अली होते.

कार्यक्रमास सुरवात पहिली परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल व संत जनार्दन स्वामींच्या फोटोला हार व श्रीफळ वाहून कऱण्यात आली.या महाविद्यालयात  शिकत असणाऱ्या शर्मिष्ठा भूमकर प्रथम वर्ष, चंद्रमनी नवगिरे प्रथम वर्ष, वरून गायकवाड प्रथम वर्ष,तंजिला इनामदार द्वितीय वर्ष,नाजीरा अन्सारी द्वितीय वर्ष,या परिचारिकांनी आपले मनोगत मांडले.

प्राचार्य इरशादअली  म्हणाले की, कोरोनाच्या काळात आमच्या महाविद्याल यातील शिकत असणाऱ्या परिचारिका यांनी श्री जनार्दन स्वामी रुग्णालयात  रुग्णसेवेचे महत्त्वाचे कार्य पार पाडले. परिचारिका यांचे काम किती महत्त्वाचे आहे हे कोरोनाच्या काळात सर्वाना कळाले.कोरोना काळात परिचारिका रुग्णांची सेवा करण्यासाठी वेळप्रसंगी कुटुंबाला दुर्लक्षित करून सेवा दिली.ती आपण कधी विसरू शकत नाही. त्यामुळे परिचारिका करीत असलेली मानवतेची सेवा नेहमीच आदरास पात्र ठरली आहे. यावेळी जील्स सुरेश,  उर्मिला सूर्यवंशी, चारुशीला भैसारे, स्वप्ननीला गव्हाणे,अंजु स्नेहा,अश्विनी गोसावी, नितीन उगले हे शिक्षक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन परिचारिका महाविद्यालयातील पायल बागुल,सुजीत होन यांनी केले.व आभार प्रदर्शन सोमनाथ उगलमूले याने केले.तसेच परिचारिका दिनानिमित्त राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाविद्यालय व श्री जनार्दन स्वामी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने महालगाव ता.वैजापूर येथे सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page