अभिनेत्री केतकी चितळेची आक्षेपार्ह टीका निंदनीय – सौ. वैशाली आभाळे
Actress Ketki Chitale’s offensive remarks are reprehensible – Mrs. Vaishali Abhale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Sun 15 May 2022, 18.40
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : राजकारणात काही विषयांवर मत-मतांतर असू शकतात. मात्र त्या आधारे खालच्या पातळीवर जावून आक्षेपार्ह टीका करणे हि आपल्या राज्याची संस्कृती नाही. त्यामुळे अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेली आक्षेपार्ह टीका निंदनीय असल्याचे वैशाली आभाळे यांनी पत्रकात म्हटले आहे आहे.
अभिनेत्री केतकी चितळेचा सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने निषेध केला आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी पुढे असे म्हटले आहे की आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या आदर्श विचारांवर चालणारा महाराष्ट्र आहे.शरद पवारयांनी राज्याच्या नव्हे तर देशाच्या संपूर्ण जडणघडणीत कृषी, सहकार, उद्योग, क्रीडा, महिला धोरण अशा अनेक क्षेत्रांत अनमोल योगदान दिले आहे. पवाराबद्दल असं बोलण्याची आपली लायकी आहे का? अशा शब्दात सौ. वैशाली आभाळे यांनी अभिनेत्री केतकी चितळेचा समाचार घेतला आहे.
विकृती व विखारी प्रवृत्तीला वेळीच ठेचणे गरजेचे असून पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतले आहे त्यामुळे तिच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी सौ. आभाळे यांनी केली आहे.





