शिवसेनेचा अल्टीमेटम दहा जूनच्या आत धारणगाव रस्ता पूर्ण होणार

शिवसेनेचा अल्टीमेटम दहा जूनच्या आत धारणगाव रस्ता पूर्ण होणार

Shiv Sena’s ultimatum Dharangaon road will be completed by June 10

खा.लोखंडे यांचेकडून जागेवर दखल, असलम शेख यांना पालिकेचे आश्वासनAssurance of the Municipal Corporation to Aslam Sheikh

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Tue 17 May 2022, 19.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव: धारणगाव रस्त्याच्या अर्धवट काम झाले आहे. या रस्त्यावरील व्यवसाय ठप्प झाला असून नागरिकांना व व्यापाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याची तक्रार शिवसेनेचे विधानसभा संघटक असलम शेख यांनी खा. सदाशिव लोखंडे यांच्या एका जाहीर कार्यक्रमात केली. असलम शेख यांनी खासदारासमोर केलेल्या तक्रारीमुळे पालिका प्रशासनाची तारांबळ उडाली.

फोटो ओळी – खा. सदाशिव लोखंडे यांच्या एका जाहीर कार्यक्रमात धारणगाव रस्त्याच्या संथ कामाबद्दल जाहीर तक्रार करताना शिवसेना विधानसभा संघटक असलम शेख

यावेळी बोलताना असलम शेख म्हणाले, पावसाळा तोंडावर आला असून तातडीने रस्ता झाला नाही तर पावसाळा संपेपर्यंत वाट पहावी लागेल. रिक्षा स्टँड चौक धर्मवीर छ. संभाजी महाराज चौक या रस्त्याचे काम चार महिन्यांपासूनच बंदच आहे. खोदकामामुळे नागरिकांना मोठा त्रास होत असून, प्रशासनाने तातडीने ठोस कार्यवाही केली नाही तर, आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. तेंव्हा पालिकेला व ठेकेदाराला १० जून पर्यंत अल्टिमेटम देत असल्याची इशारा दिला.

रस्त्यांसाठी नगरपालिकेला भरीव निधी दिला असतानाही धारणगाव रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मार्च महिन्यात खोदकाम केले पण, त्यानंतर रस्त्यांचे कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. काही ठिकाणी खोदकाम करून तीन ते चार महिने उलटून गेले तरी, पुढील काम सुरू केले जात नसल्याने वाहनचालकांसह परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. रस्ता करायचा नव्हता तर, रस्ता उखडून ठेवला कशाला, असा प्रश्न यानिमित्ताने असलम शेख यांनी केला आहे.रस्ता बंद करून बगीचे करा असेही ते म्हणाले.

याबाबत बोलतांना असलम शेख म्हणाले, नवीन रस्ता होणार म्हणून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. संपूर्ण रस्ता खोदून काढल्यानंतर या रस्त्याच्या पुढील कामाला सुरुवात झाली नाही. एका बाजूने नवीन रस्त्याचे संथ गतीने काम सुरू आहे तर, दुसऱ्या बाजूचा रस्ता खड्डेमय झाला आहे. या मार्गावर कोठेही दुभाजक नसल्याने वाहनधारक खड्डे वाचविण्यासाठी मिळेल त्या मार्गाने वाहन नेतात. परिणामी हा मार्ग अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे.या रस्त्यांचे काम अत्यंत कासवगतीने होणे अयोग्य आहे.संथ गतीने होणाऱ्या या कामास पूर्णत: प्रशासन जबाबदार आहे. कंत्राटदाराची मनमानी सुरू आहे दुसरे काय. रस्त्यांचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. नगरपालिका प्रशासनाने तंबी देऊनही कामाला का गती मिळत नाही, हाच प्रश्न आहे.

अपूर्ण व संथ कामामुळे नागरिक खूपच त्रस्त झाले आहेत. या कामाला तातडीने गती न दिल्यास आम्ही पोलिस ठाण्यात संबंधिताविरोधात तक्रार करणार आहोत. असेही असलम शेख यांनी सांगितले व याबाबत यांनी कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्याबरोबर ही चर्चा केली आहे. पोलीस निरीक्षक देसले यांनी संबंधित ठेकेदारांबरोबर संपर्क साधला असल्याचे समजते.

असलम शेख यांच्या तक्रारीनंतर खा. सदाशिव लोखंडे यांनी दखल घेत सदर ठेकेदाराला भ्रमणध्वनीवरून चांगलेच सुनावले  यानंतर ठेकेदार यांनी असलम शेख यांना दहा जूनच्या आत काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले.

कोट

निधी असूनही कंत्राटदार संथ गतीने काम करत आहेत. नागरिकांना नाहक त्रास होत असून, नगरपालिकेची बदनामी होत आहे. आतापर्यंत काम होणे अपेक्षित होते पण, प्रत्यक्ष ४० टक्केच काम झाले असून.३० जूनपर्यंत रस्त्याचे पूर्ण काम करून देण्यात येईल. यासंदर्भात ठेकेदाराकडून हलगर्जीपणा होत असल्यास कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. – शांताराम गोसावी, कोनपा, मुख्याधिकारी

Leave a Reply

You cannot copy content of this page