युवक ते आबालवृद्धांसाठी प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात अद्यावत योगाभवन करणार-खा.लोखंडे

युवक ते आबालवृद्धांसाठी प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात अद्यावत योगाभवन करणार-खा.लोखंडे

An updated Yoga Bhavan will be organized in every municipal area for youth and young and old

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Tue 17 May 2022, 19.20
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिकारासह खासदार म्हणून मला पाच कोटी दिला त्या निधीतून तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी प्रत्येक नगरपालिकेचा क्षेत्रात अद्यावत योगाभवन उभे करण्याची आपली संकल्पना आहे तिचा शुभारंभ कोपरगाव तालुक्यातून होत असल्याचे प्रतिपादन खासदार सदाशिव लोखंडे यांनी मंगळवारी कोपरगाव येथे केले. कोरोना काळात महाराष्ट्र राज्याला यशस्वीपणे कोरोना मुक्त करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे उत्तम काम केले याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो असेही ते म्हणाले.

खा. लोखंडे पुढे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांना योगा करण्यासाठी जागा नसते एखाद्या मंगल कार्यालयात जागा मिळाली तर लग्न असल्यास दोन दिवस त्यांना योगा बंद ठेवावा लागतो किंवा मिळेल तिथे करावा लागतो. अनेकदा योग गुरु येतात त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी योग्य हॉल मिळत नाही त्यामुळे जेष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन मिळू शकत नाही म्हणून माझ्या डोक्यात एक कल्पना आली आपल्या शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये अकोला ते नेवासा अशा आठ नगरपालिका आहे प्रत्येक नगरपालिकेत जर आपण योगा भवन केले तर ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ महिला त्या ठिकाणी बसतील योगाच्या माध्यमातून आपली एनर्जी कशी वाढेल व ध्यानाच्या माध्यमातून आत्मा शुद्धीकरण कसा होईल रुपाने होईल लहान मुले असतील त्यांचे कराटे वर्ग होतील असे अनेक आरोग्यविषयक कार्यक्रम याठिकाणी घेता येतील असे त्यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमास जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई विजय वहाडणे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, शिवसेनेचे नितीन औताडे, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, प्रमोद लबडे, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, विधानसभा संघटक असलम शेख, माजी शहर प्रमुख सनी वाघ, जिल्हा नियोजन विशाल झावरे, शेतकरी सेना किरण खर्डे, ग्राहक सेना शहराध्यक्ष रवींद्र कथले, युवा सेना सिद्धार्थ शेळके, युवा सेना आशिष निकुंभ, माजी नगरसेविका वर्षा शिंगाडे आदी मान्यवरांसह शिवसैनिक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

नगरपालिका मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविकांत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता प्रशांत वाकचौरे यांनी साई सिटी येथे सिटी सर्वे नंबर ११६ मध्ये वीस गुंठे च्या जागेवर जिल्हा वार्षिक योजना २०२०-२०२१ या ७५ लक्ष निधीतून २६०० चे स्वेअर फुटाचे दोन मजली अद्यावत असे योगाभवन होणार असल्याची माहिती दिली. शेवटी आभार शिवसेनेचे कार्याध्यक्ष रावसाहेब थोरात यांनी मानले.

चौकट

कोरोना पेशंट वाढत असताना योग करायला पाहिजे योगा पासून एनर्जी मिळते त्यातून मिळालेल्या ताकदीमुळे कोरोनावर मात करू शकतो अशी परिस्थिती पूर्ण देशांमध्ये व जगामध्ये झाल्याचे आपण पाहिलं आहे. योगाची जाणीव वयाच्या ५० व्या ६० व्या वर्षी होते परंतु त्यावेळेस शरीर साथ देत नाही. म्हणून १४ ते १८ वर्षापासून योग ध्यान अभ्यास सुरु केल्यास शरीर व मन तंदुरुस्त राहील ध्यानातून इच्छाशक्ती वाढेल.

Leave a Reply

You cannot copy content of this page