ना. काळेंच्या अडीच कोटी निधीतील संजीवनी ते पढेगाव रस्त्याच्या कामाची सुरुवात
No. Commencement of work on Sanjeevani to Padegaon road with a fund of Rs 2.5 Crores
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Tue 24 May 2022, 18.40
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोकांना कोपरगाव येथे येण्यासाठी कोपरगाव वैजापूर रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाल्याने हा रस्ता करून मिळावा अशी नागरिकांची मागणी ना. आशुतोष काळे यांनी अडीच कोटी निधी देऊन पूर्ण केली आहे त्या कामाची सुरुवात झाली आहे अशी माहिती आ.आशुतोष काळे संपर्क कार्यालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी अडीच वर्षात जवळपास १४५ कोटी रुपये निधी आणला.यातून पूर्व भागातील अनेक रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत तर काही रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. शिरसगाव-तिळवणी पूलासाठी २.९८ कोटी निधी दिला त्यामुळे काम पूर्णत्वाकडे जात आहे. शिंगणापूर, पढेगाव,करंजी, ओगदी, शिरसगाव, सावळगाव, कासली, आपेगाव, तिळवणी, आदी गावातील नागरिकांना कोपरगावला येण्यासाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या पढेगाव गोदावरी डाव्या कालव्यापर्यंतच्या रस्त्याच्या कामाची सुरुवात केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
यावेळी कारभारी आगवन, बाळासाहेब बारहाते, संजय आगवन, सांडूभाई पठाण, नारायण भारती, मधुकर चव्हाण, तुषार बारहाते, जालिंदर संवत्सरकर, मंगेश बारहाते, गोवर्धन परजणे, योगेश भोकरे, संजय संवत्सरकर, योगेश कुऱ्हे, कैलास संवत्सरकर, किरण शिंदे, सुनील मलिक, मनोज शिंदे, प्रकाश मलिक, रमेश परजणे, सुरेश संवत्सरकर, अखिलेश भाकरे, लक्ष्मण निरगुडे, विलास परजणे, गणेश दाणे, घनश्याम कुऱ्हे, कैलास कुऱ्हे, बाबासाहेब शिंदे, एकनाथ शिंदे, अण्णासाहेब शिंदे, लाला आजगे, अनिल कुऱ्हे, विनोद शिंदे, बाळासाहेब जाधव, मच्छिन्द्र शेटे, सुदाम आगवन, सुनील जाधव, उत्तमराव गायकवाड, गोरक्षनाथ शिंदे, सतीश शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय शिंदे, दिलीप शिंदे, रमेश शिंदे, राजेंद्र संवत्सरकर, किरण चव्हाण, भाऊसाहेब संवत्सरकर, सचिन कुऱ्हे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.