कोपरगावात शेतक-यावर पिसाळलेल्या लांडग्याचा हल्ला

कोपरगावात शेतक-यावर पिसाळलेल्या लांडग्याचा हल्ला

A wolf attacks a farmer in Kopargaon

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Tue 24 May 2022, 19.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव :   तालुक्यातील वेळापुर येथील अनिल तुकाराम खोडके (४८) याच्यावर पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला करुन त्यांना जखमी केले, पण जिल्हा व तालुका वनविभागाच्या अधिकाऱ्यांना त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, तेव्हा वनविभागाने या जखमी व्यक्तीला तात्काळ वैद्यकिय आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वैराळ यांनी केली आहे.

 ते पुढे म्हणाले की, अनिल खोडके हे १९ मे रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्या शेतातून घरी परतत होते, त्यावेळी त्यांच्यावर मंडलीक वस्ती परिसरात पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला केला त्यात त्यांचे डोळ्याला मोठी इजा झाली.   त्यांना स्थानिक डॉ. दिघे यांच्याकडे नेण्यांत आले तेथून त्यांना नाशिक जिल्हा  रुग्णालयात उपचारासाठी हलविले त्यांत त्यांना १५ टाके पडले.  एव्हढी मोठी घटना होऊनही वन विभागाचे अधिकारी व त्यांचे कर्मचारी वन हद्दीतून होत असलेल्या वालू वाहतुकीची वाहने धरून त्यांच्याकडून चिरीमिरी गोळा करत आहे असा आरोप राजेंद्र वैराळ यांनी केला.

याप्रकरणी वनाधिकारी श्रीमती माने व सोनवणे यांच्याशी वैराळ यांनी संपर्क साधला. जखमी अनिल खोडके यांची परिस्थीती गरीबीची आहे तरी त्यांना तत्काल वैद्यकिय आर्थिक मदत द्यावी व तालुक्यातील बिबटे, लांडगे आदिं हिंस्र वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करून शेतात रात्री-अपरात्री पाणी भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व लोकवस्तीत नागरिकांवर वन्यप्राण्यांचे होणारे हल्ले थांबवण्यासाठी धडक कारवाई करून त्याबाबतचा आराखडा तयार करावा असेही ते शेवटी म्हणाले.

Leave a Reply

You cannot copy content of this page